शिरपुर तालुका भाजपा तर्फे दि. १४ ऑगस्ट हा दिवस 'फाळणी दुःखद स्मृती दिन' पाळण्यात आला. या दिवशी फाळणीच्या कटू आठवणी जाग्या करण्यात आल्या. दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी झालेल्या त्या दिवशी बलिदान झालेल्या भारताच्या फाळणी दरम्यान लाखो लोकांनी अनुभवलेल्या दुःख, आघात व विस्थापनाचे स्मरण करण्यासाठी फाळणी दुःखद स्मृती दिन म्हणून दरवर्षी १४ ऑगस्ट पाळण्यात येतो. प्रचंड मानवी नुकसानीची आठवण करून देत शांतता, एकता आणि सलोखा या मूल्यांना प्रोत्साहन देण्याचा याचा उद्देश आहे. शिरपुर तालुक्यात भाजपा तर्फे वाघाडीत वीर शहिद जवान मनोज संजय माळी यांच्या स्मारकावर मार्ल्यापण करुन स्मृती दिवस पाळण्यात आला. आ. काशिराम पावरा, धुळे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे जिप मा. अध्यक्ष तुषार रंधे यांच्या हस्ते शहिद वीर जवान मनोज माळी यांच्या मातोश्री. सौ. सुरेखा संजय माळी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच परिसरात स्वच्छाता मोहिम राबविण्यात आली. यावेळी सरपंच किशोर माळी, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपुर ग्रामिण मंडळ अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, थाळनेर मंडळ अध्यक्ष विरपाल राजपुत, सुभाष नगर सरपंच विजय पवार, जगन पाटील आदि उपस्थित होते.
0 Comments