*एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणाऱ्या कृतीशील आक्रमक राजकीय युवा नेत्याचा आज वाढदिवस अगदी कमी वयात दिपक दादा यांनी आपले सामाजिक भान दाखवताचं उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे.*
" *किसी मक्सद के लिये खडे रहे तो..एक पेड की तरह ..गिरे भी तो बीज की तरह , ताकि दुबारा उगकर उसी मक्सद के लिये जंग कर सके "*
शिंदखेडा तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांची भूमी म्हणून ओळखली जाणारे दलवाडे प्र. न. एक सर्वसामान्य लोकांचे गाव त्यातून सर्वसाधारण परिस्थितीत शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले बालक आज त्यांच्या अथक कष्ट, मेहनत व हुशारीच्या प्रयत्नातून संघर्षमय परिस्थितीतून घडलेले शिक्षण सम्राट, संघर्ष योद्धा, सर्वसामान्यांचा आधार स्तंभ, कार्यसम्राट, जनसेवक अशा कितीतरी जनतेच्या मनातून मिळवलेल्या पदव्या बहाल झालेले एक युवकांचे प्रेरणास्थान मा. दीपक दादा गिरासे यांचा जन्म 15 आगस्ट 1986 रोजी झाला लहान वयात हुशार बुद्धी व मनमिळाऊ स्वभाव व कामाचे जिद्द मनात घेऊन आपले स्वप्न सजवत गेले वयाच्या अवघ्या 18 वर्षात आपले शिक्षण पूर्ण करून सिविल कॉन्ट्रॅक्टर झाले अनेक कामे त्यांच्या हातून झालीत वयाच्या 25 व्या वर्षी माळमाथा परिसरात देगाव येथे शैक्षणिक संस्था सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांसाठी उघडवली आज त्या संस्थेत इयत्ता नर्सरी पासून बारावी सायन्स तसेच आयटीआय कॉलेज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर चे विविध कोर्सेस मधून तालुक्यातील शेकडो विद्यार्थी घडविले. गेल्या दहा वर्षात सर्वसामान्य कुटुंबातील शकडो युवक त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून त्या युवकांना स्वतःच्या पायावर उभे केलीत. म्हणूनच युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांना संबोधले जाते त्यांच्या या अथक प्रयत्नातून आज अनेक कुटुंबांना मदत होत आहे.
2019 मध्ये त्यांच्या आईसाहेब मीनाताई गिरासे यांचं आकस्मित निधन झाले आई साहेबांच्या प्रेरणेतून त्यांनी हे त्यांचे विश्व निर्माण केले अशाप्रकारे आईसाहेबांची प्रेरणा व आशीर्वाद कायम त्यांना मिळावेत म्हणून त्यांनी देगांव यथील त्यांच्या जयदीप नॉलेज कॅम्पस येथे वर्ष 2020 प्रेरणास्थान म्हणून राजपूत समाजातील सोलंकी परमार परिवारातील पहिल्या महिला आहेत की त्यांचा पुतळा स्मारक त्यांनी बांधले व देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते व काही इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ्याचे लोकार्पण सुद्धा त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ केले. त्यानंतर राजकीय जीवनात राष्ट्रवादी च्या तिकिटावर पंचायत समितीमध्ये जवळपास चार हजार मते घेतली तसेच जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून राष्ट्रीय पक्ष भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांना चांगली टक्कर देत 4000 मतं घेतली परंतु मोठ्या राजकीय मतांचा डावपेच मध्ये थोड्या मतांनी त्यांचा पर्याय झाला त्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यावेळी त्यांच्या निवडणुकीची चर्चा रंगली होती.
त्यांच्या आई साहेबांची समाधी व अंतविधी त्यांच्या मूळगाव येथे केली व खरी समाजसेवेची व विकासाची सुरुवात दीपक दादा गावासाठी केली त्यांनी त्यांच्या वडिलांना आईच्या दुःखद निधनाचा विसर पडावा म्हणून 2021 मध्ये आपले मूळ गाव दलवाडे गावातील ग्रामपंचायत निवडणूक मध्ये आपले संपूर्ण अपक्ष पॅनल उभे करून संपूर्ण सदस्य निवडून वडिलांना बिनविरोधक सरपंच केले.
आज दलवाडे गावात अनेक विकासाची कामे झालीत गेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या नंतरच्या काळात या गावात विकासाचा हवा तसा निधी आला नाही म्हणून या गावाचा विकास पाहिजे तसा दिसून येत नव्हता परंतु आज दीपक गिरासे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने यांच्या अथक प्रयत्नातून व काही स्वखर्चातून गावात अनेक चांगली कामे झालीत अमरधाम सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज बाल उद्यान बांधले, एकलव्य महाराज पुतळा बसविला, प्रमुख काँक्रीट गटारी, गलींमध्ये काँक्रीट रस्ते, मराठी शाळा सुशोभीकरण, गाव तलावातील गाळ काढून खोलीकरण करणे, गावातील नाले साफसफाई करून गाळ काढणे, 200 घरकुले, 26 सिंचन विहीर, फिल्टर प्लॅन, गावातील येणारे प्रमुख रस्ते प्रशासनाकडून मंजूर करून आणलीत असे अनेक कामे त्यांनी गावात करून दाखवलीत.
आज शिंदखेडा तालुक्यात त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे दीपक गिरासे हे नाव सर्वांना परिचित झालेले आहेत .अशा संघर्ष योद्धा ला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत अनंत शुभेच्छा...
*आण्णा कोळी ,महादेवपुरा दोंडाईचा*
0 Comments