वारकरी साहित्य परिषदेचे राज्य अध्यक्ष विठ्ठल काका यांच्यामार्गदशानाखाली व खानदेश विभागीय अध्यक्ष विशाल माळी यांचे नेतृत्वाखाली व वारकरी साहित्य परिषदेचे धुळे कार्याध्यक्ष ह भ प दिलीप महाराज तालुका अध्यक्ष पांडुरंग माळी प्रफुल राजपूत यांनी महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ यांची मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात भेट घेऊन महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा असा वारकरी संप्रदाय असून या संप्रदायातील फडकरी वारकरी हे नियमित पंढरपुर येथे पायी दिंडी चालक तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दिंडी चालकांना 20,000 रुपये मदत जाहीर केले होते मात्र यात काही दिंडी चालकांना ती मदत मिळाली नाही तरी त्यांनाही शासनाने मदत द्यावी तसेच ज्येष्ठ वारकरी यांना मानधन सुरू करण्यात यावे कलावंतांची कमेटी स्थापन करून त्यांची प्रकरणी निकाली काढून मानधनासाठी पात्र वृद्ध कलावंत यांचे मानधन चालु करण्यात यावे तसेच नवीन कमिटी स्थापन करून प्रस्तावित प्रकरणे निकाली काढण्यात यावी पात्र लाभार्थ्यांना वुद्ध कलावंत मानधन चालू करण्यात यावे मागणी करण्यात आली यावेळी वारकरी साहित्याचे पैसे चे विभागीय अध्यक्ष विशाल माळी कार्याध्यक्ष ह भ प दिलीप महाराज तालुका अध्यक्ष ह भ प पांडुरंग माळी यांनी नामदार छगनराव भुजबळ यांचे विठ्ठल रुक्मिणीचे मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील शोभाताई खैरनार खानदेशातील वारकरी साहित्य परिषदेचे पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments