Header Ads Widget

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत अंकित देसलेचे यश

बेटावद प्रतिनिधी 

 जवाहर नवोदय विद्यालय समिती यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सन २०२३ -२४ मधील प्रवेश परीक्षेत शिंदखेडा येथील जनता हायस्कुलचा विद्यार्थी अंकित किशोर देसले यांने २० जानेवारी २०२४ ला दिलेल्या प्रवेश परीक्षेत इतर मागास वर्ग संवार्गातून ११३/४  व्या क्रमांकाने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत येऊन जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी यश मिळवले असून तो खलाणे ता शिंदखेडा येथील प्रगतशील शेतकरी किशोर रामदास देसले व श्रीमती संगीता देसले यांचा सुपुत्र असून यशस्वी विद्यारर्थ्यांस गुरुकुलाचे अध्यापक संजयकुमार महाजन यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. या यशासाठी जनता हायस्कुल हायस्कुलचे चेअरमन मनोहर पाटील, मुख्याध्यापक एस एस पाटील व शिक्षकवृंदानी अभिनंदन केले असून खलाणे गावाच्या परिसरात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशासाठी कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments