Header Ads Widget

*बेटावद येथील ललवाणी विद्यालयात ध्वजारोहण समारंभ उत्साहात साजरा*


आसिफ पठाण बेटावद प्रतिनिधी
      
बेटावद येथील गुरु ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल व श्रीमती पी व्ही पाटील प्राथमिक विद्यामंदिर तसेच श्री फ मु ललवाणी माध्यमिक विद्यालय व डॉ.दादासाहेब श्री तू गुजर उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक15/08/2025 शुक्रवार रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 2024-25 या शैक्षणिक वर्षी इयत्ता10 ला प्रथम आलेला गुणवंत विद्यार्थी दर्शन ज्ञानेश्वर गुरव तसेच इयत्ता12  ला  कला शाखेत प्रथम आलेला हितेश सोनवणे या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला जनता शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक आदरणीय प्रकाश शेठ ललवाणी तसेच श्री एस एन जैन सर त्याचप्रमाणे बेटावद गावातील भारतीय सैन्यात सेवेत असणारे आजी व माजी सैनिक त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध पदांवर कार्यरत पदाधिकारी, पत्रकार, वकील व विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .ध्वजारोहण समारंभा नंतर विद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी वर्षभरात केलेल्या कामगिरीबद्दल मेडल व प्रमाणपत्र त्याचप्रमाणे त्यांना मिळालेल्या रँक मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक पसायदान म्हटले तसेच विद्यालयातील जवळपास 900 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर संगीताच्या धून मध्ये अतिशय सुंदर रित्या सामूहिक कवायत सादर केली. या कवायतीचे संचलन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री महेंद्र जमदाडे सर व एनसीसी विभाग प्रमुख श्री विकास दाभाडे सर यांच्या मार्गदर्शनाने झाले. यावेळी सर्व गावातील मान्यवरांनी या संगीत कवायतीच अगदी मनापासून कौतुक केले .या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक श्री सूर्यकांत पाटील सर यांनी केले यानंतर विद्यालयातील एनसीसीच्या पथकाने तसेच स्काऊट व गाईडच्या पथका मार्फत गावातून रॅली काढून रॅलीचा समारोप शहीद शशिकांत पवार यांच्या स्मारकाजवळ करण्यात आला यावेळी सर्वांनी शहीद शशिकांत पवार यांना मानवंदना दिली. या कार्यक्रमासाठी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवेंद्र पवार सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सदाशिव माळी सर उपमुख्याध्यापक श्री विजय कढरे सर पर्यवेक्षक श्री प्रवीण माळी सर तसेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments