शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गायत्री माता प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम सी बी एस सी स्कूल येथे स्वातंत्र्य दिवसाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे उपस्थित होते.तसेच उपाध्यक्ष श्री अमजद मेहमूद कुरेशी सचिव श्रीमती मिरा मनोहर पाटील,माजी मुख्याध्यापक श्री डी.डी.भोई ,श्री बी.बी.मराठे श्री के एच.पाटील श्री आर.एस.सावळे श्री ए एच पाटील श्री डी के सोनवणे श्री के आर पाटील शिक्षकेतर कर्मचारी श्री टी.जे गिरासे तसेच माजी सैनिक शशिकांत महाले,श्री दिनेश निकम, संघ प्रचारक श्री कल्याणजी भैरवार,प्राचार्य श्री एस एस पाटील पर्यवेक्षक श्री बी जे पाटील जेष्ठ लिपीक किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्व शालेय विद्यार्थ्यांनी संचलन करत राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. तसेच भारत सरकारने निर्गमित केलेली संगीतमय कवायत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने व आनंदाने मान्यवरांसमोर सादर करत मान्यवरांची दाद मिळवली. सदर कवायतीला उपशिक्षक श्री जे डी बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून नगरपंचायत शिंदखेडा यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला यात प्रथम पुष्कर विजय पाटील द्वितीय निखिल प्रकाश माळी तृतीय रोशनी गणेश परदेशी तर उत्तेजनार्थ जयश्री बेहेरे व यश माळी यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवत यश प्राप्त केले तसेच संभाजीनगर ग्रामीण फाउंडेशन टॅलेंट हंट परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेली विद्यार्थिनी योगेश्वर सुनील पाटील हिच्यासह सर्वांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार श्री ए.टी.पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री एस के जाधव ,श्री डी एच सोनवणे श्री जे.डी.बोरसे,श्रीमती एन जी देसले, श्रीमती व्ही एच पाटील, श्रीमती पी एस पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Comments