शिंदखेडा तालुक्यातील वायपूर येथील श्री गुरुदत्त हायस्कूल व कला कनिष्ठ महाविद्यालय वायपूर ता.शिंदखेडा जि.धुळे या विद्यालयात नुकताच *सन -१९८९-१९९० या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १०वीच्या (बॅचेसचे) माजी विद्यार्थी -विद्यार्थ्यांनींचा स्नेहमिलन कार्यक्रम* दिनांक २२/११/२०२५ शनिवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना व विद्यार्थ्यांना फेटे बांधून श्री गुरुदत्त्तात्रय बाबाचे दर्शन घेऊन शाळेकडे निघून वर्गात आसनस्थ झाले.सर्व शिक्षकांनी तासिका घेऊन सर्व विद्यार्थ्यांना छड्या देऊन जुन्या आठवणीना उजाळा दिला.(उदा."छडी लागे छम छम विद्या येई घम घम!")
तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब श्री.आर.बी.परदेशी सर,तसेच प्रमुख पाहूणे-आदरणीय श्री.एम.जे.पवार सर, श्री.आर.बी.पवार सर,श्री.एम.यू पाटील सर,श्री.के.बी.भामरे सर,श्री.डी.डी शिंदे सर, श्री.के.जी.पाटील सर,श्री.ए.यु. पाटील,भाऊसाहेब,व विद्यमान मुख्याध्यापक श्री.उमेशजी देसले सर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रथमतः विद्येची आराध्य देवता "माता सरस्वती" मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. व यावेळी काही दिवंगत मुख्याध्यापक,शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना आदरांजली वाहण्यात आली.
तद्नंतर सर्व शिक्षकांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. नंतर उपस्थितांनी एकमेकांचे ओळखपरिचय करुन दिलेत,व प्रत्येकाने गुरुजनांनकडून सन्मान स्वीकारला. यावेळी कार्यक्रमासाठी श्री शांताराम कदम कलमाडी, लोटन पाटील वायपूर, भटू खैरनार विटाई,भानुदास पाटील विटाई, श्रीराम शिरसाठ विटाई,भगवान खैरनार विटाई, प्रफुल्ल खैरनार वायपूर,आल्केश खैरनार वायपूर, बाळू खैरनार वायपूर, दगा पाटील वायपूर, विलास खैरनार वायपूर, जितेद्र एंडाईत वायपूर, परमेश्वर पाटील सार्वे, जिजाबराव खैरनार पिंपरखेडा ,भगवान देवरे पिंपरखेडा,गजानन झालसे कलमाडी,
निंबाजी कदम कलमाडी, मनोहर झालसे कलमाडी,संजय झालसे कलमाडी,विजय झालसे कलमाडी,चतुर पाटील कलमाडी, प्रकाश शिरसाठ चांदगड, रतिलाल आखडमल चांदगड, बारकू आखडमल चांदगड, गुलाब वाघ पिंपरखेडा, दिलीप वाघ पिंपरखेडा, संजय देवरे पिंपरखेडा, विशाल पाटील सार्वे,
तसेच विद्यार्थ्यांनींपैकी -
सौ.मंगलताई वायपूर, सौ हेमलताताई वायपूर,सौ.सुरेखाताई वायपूर,श्रीमती मालूताई लोहार वायपूर, सौ.रंजनाताई कोळी वायपूर, सौ. आशाताई वायपूर,सौ. अलकाताई वायपूर आदी मित्र मैत्रिणी उपस्थित होते.
त्यानंतर शेवटी सर्व उपस्थितीत बंधू भगिनीनी जेवणाचा आस्वाद घेतला. व "आपण केवळ ३५ वर्षानी एकत्रीत आलो हे आपले व गुरुजनांचे परमभाग्यच मानावे लागेल". सर्वानी एकमेकांना शुभेच्छा!🌹🌹💐💐💐 देऊन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - माजी विद्यार्थी व अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी येथे कार्यरत असलेले विद्येमान प्रेरणास्रोत मुख्याध्यापक श्री शांताराम कदम सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन - श्री भटू खैरनार व मालूताई लोहार यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.लोटन पाटील यांनी प्रयत्न केले.व सर्व उपस्थितीतांच्या सहकार्याने कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने करण्यात आले.
0 Comments