पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या व न्याय हक्कासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला आहे या साठी धुळे जिल्हातील पोलीस पाटील यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मा तालुका कार्याध्यक्ष युवराज माळी पोलीस पाटील भडणे
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली,श्री ज्ञानेश्वर महाजन राज्य उपाध्यक,भाऊसाहेब पाटील सर राज्य सघटक,प्रवीण गोसावी खान्देश अध्यक्ष,लिलाताई पाटील महिला राज्य सदस्या यांच्या मार्गदर्शनाखाली व सहयोगी संघटनांच्या संयुक्तपणे सहयोगाने दिनांक १०डिसेबर रोजी पोलीस पाटील न्याय व हक्कासाठी नागपूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.त्यासाठी सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त पोलीस पाटील यांना या मोर्चात सहभागी करून शासनाकडे आपल्या प्रलंबित मागण्या मंजुर करून घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघ वेळोवेळी प्रलंबित मागण्या संदर्भात पाठपुरावा करत आलेला आहे काही दिवसांपूर्वी विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील सचिवांच्या उपस्थित बाळासाहेब शिंदे पाटील यांनी बैठक आयोजित केली आणि वयाचे ६०वरून ६५करावे या प्रमुख मागणीसह नुतनीकरण बंद करावे, सेवावृत्तीनतर पोलीस पाटील यांना एकरकमी पैसे द्यावे,विमा कवच, पोलीस पाटील अधिनियम दुरूस्ती अशा अनेक मागण्या संदर्भात चर्चा होऊन त्यावर उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे साहेब यांनी प्रस्ताव पाठविण्यासाठी सचिवांना सुचना दिल्या होत्या.त्यावर मंत्रीमंडळाने त्यावर लवकरच निर्णय घ्यावा यासाठी पोलीस पाटील यांची ताकद होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात दाखवुन आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मंत्रीमंडळाला निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे.
घरी बसुन आपल्या पदरात काहीच पडणार नाही त्यासाठी एकजुट करून महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाचे कणखर नेतृत्व बाळासाहेब शिंदे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आपण ताकद उभी करणे गरजेचे आहे.आजपर्यत बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य मोर्चे काढण्यात आले आणि त्याचा फायदा नक्कीच झाला.पोलीस पाटील वयोमर्यादा वाढ नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिंदखेडा तालुका मा कार्याध्यक्ष पाटील युवराज माळी पोलीस पाटील भडणे यांनी केले आहे
0 Comments