सुजाण नागरिक प्रतिनिधी श्री सी जी वारूडे
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकतीच "डॉ.बाबासाहेब आंबेडकर "यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात भारतीय राज्यघटनेने शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय प्रेरणास्रोत मार्गदर्शक मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रेरणास्थान संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्री जे.बी.पाटील, यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषण केले नंतर विद्यालयातील शिक्षकांनी ही मनोगत व्यक्त केले.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक आबासो.एस.ए.कदम सर यांनी समता स्वातंत्र्य, बंधुता, मानवता या मूल्यांची शिकवण समाजाला देत बहुजन समाजाच्या उध्दारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला; अस्पृश्यता निवारण, शेतकरी, स्त्रियांचे हक्कांसाठी अविरत कार्य केले
तसेच या भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव नाशवंत आहे, मृत्यू हा त्याचा अंतिम टप्पा आहे म्हटले जाते की,जन्मानंतरचा पहिला श्वास आणि मृत्यूपूर्वीचा शेवटचा श्वास या दोन श्वासातील अंतर म्हणजेच 'आयुष्य ' या आयुष्याच्या वाटेवर हवे असलेले नको असलेले जीवन जगावंच लागत म्हणून जीवनात काही व्यक्ती स्वतः पुरतं जगतात.
स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की,"जे फक्त स्वतःसाठी जगतात ते जीवंतपणीच मृत असतात व जे इतरांसाठी जगतात ते मेल्यानंतर ही जिवंत असतात",म्हणून"संविधान" हे एक जीवन शैलीला प्रेरणादाय घटना होय.
तर "तू लढला नाही तरी चालेल,पण तू विकला जाऊ नको,तू विकला गेला तर समाजाला कमजोर करशील" तुमच्या असलेल्या परिस्थितीला ताकद बनवा असे अनमोल शब्द समाजाला देणार भारतीय संविधानाचे निर्माते,३२डिग्री संपादित करणारे बुध्दीचे महासागर व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब! शिका, संघटित व्हा आणि संघर्ष.
म्हणूनच सुसंस्कृत मन ही स्वातंत्र्याची प्रेरक शक्ती मानते.व "शिक्षण हे माणसाला विचार देते शिक्षण हे पवित्र आहे आणि त्याचे पावित्र्य राखण्यासाठी नितांत गरज आहे", म्हणून म्हटलं जाते "शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही!"इ विषयी मनोभाव व्यक्त केले
यावेळी कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग, मुख्याध्यापक शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-
श्री एस बी भदाणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन-श्री.एस.एस.पाटील सर यांनी मानले.
0 Comments