==================================
डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील == दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी गोराणे ता,शिंदखेडा येथे महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी तालुका गटविकास अधिकारी रमेश नेतनराव हे होते तहसीलदार नितीन कुमार देवरे उपस्थित होते मा ,जि प सदस्य पंकज कदम, पं,स,सदस्य प्रवीण मोरे, नायब तहसीलदार विजय गोस्वामी, संजीवनी सिसोदे ,मा ,सभापती किशोर रंगराव पाटील, मा सरपंच प्रकाश पाटील, मा, सरपंच दिलीप पाटील, मंडळ कृषी अधिकारी आर डी मोरे, सत्यजित सिसोदे ,पत्रकार आर आर पाटील, गोराने सरपंच भटू आखाडे ,तालुका पुरवठा अधिकारी नितीन नंदावर नरडाणा मंडळ अधिकारी स्वाती वाघ, प्रफुल्ल मोरे तलाठी, अमृत शिंदे कोतवाल इत्यादी मान्यवरांसह गोराणे गावातील व परिसरातील प्रचंड शेतकरी शेतमजूर लाभार्थी हजर होते व या योजनेचा लाभ घेतला या शिबिरात सातबारा, खाते उतारा ,वारस नोंदी दुरुस्ती ,शिधापत्रिका ,जातीचे दाखले ,उत्पन्नाचे दाखले ,डोमासाईल प्रमाणपत्र, कुटुंब अर्थसहाय्य योजना इत्यादी 258 दाखल्यांचे वाटप झाले या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे बारा स्टॉल उभारण्यात आले होते वरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी गोराणे व मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी तसेच महसूल सेवक सरपंच व ग्रामस्थ व सुधाकर नीलकंठ पाटील गोराणे यांनी विशेष परिश्रम घेतले व वरील कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला व जनतेने शासनाचे आभार मानले
0 Comments