Header Ads Widget

*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाबासाहेब पाटील, राजेंद्र दर्डा, मधुकर भावे**यांच्या मुख्य उपस्थितीत 18 एप्रिल शनिवार रोजी परिषदेच्या अधिवेशनाचे भव्य उद्घाटन**देशभरातून 2500 पत्रकार उपस्थित राहणार*..



मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं 44 वं राष्ट्रीय अधिवेशन 18 आणि 19 एप्रिल 2026 रोजी रोजी उदगीर इथे होत आहे. उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहात असून लोकमतचे समुह संपादक मा. श्री. राजेंद्र दर्डा अधिवेशनाचे उद्घाटन करतील.आ. श्री. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.. बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत तर आमदार मा. श्री. संजय बनसोडे सह स्वागताध्यक्ष आहेत. परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. श्री. एस.एम.देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तर मा. श्री. मिलिंद अष्टीवकर हे अधिवेशनाचे अध्यक्ष असतील. ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. मधुकर भावे यांचे मार्गदर्शन पत्रकारांना लाभणार आहे.
18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात अधिवेशनाचे उद्घाटन होईल. तत्पूर्वी उदगीर शहरातून प्रभात फेरी काढली जाणार असून त्यामध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी  सहभागी होतील. दुपारच्या सत्रात उदगीरमधून बाहेर पडून पत्रकारितेच्या क्षेत्रात देदीप्यमान यश मिळविणाऱ्या पत्रकारांचा सत्कार आणि त्यांच्या मनोगताचा कार्यक़म प्रा. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.. दुपारी 4 ते 5.30 या वेळेत "*लोकप्रतिनिधींच्या माध्यमांकडून अपेक्षा*" या विषयावर आमदार रोहीत पवार यांची मुलाखत घेतली जाणार आहे..रात्री 7 वाजता **लोककलेचा जागर**हा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल..

19 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष *सुनील तटकरे* याची मुलाखत होईल.. पुढारी न्यूज चे संपादक *प्रसन्न जोशी* ही मुलाखत घेतील.. सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत *माध्यमं सत्ताधाऱ्यांना झुकतं माप देताहेत का*? या विषयावरील परिसंवादात भाजप उपाध्यक्ष केशव उपाध्ये, कॉंग्रेसचे हनुमंत पवार, राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण, शिवसेनेचे राहूल लोंढे, उबाठाचे जयेश वाणी हे विविध राजकीय पक्षांचे प्रवक्ते सहभागी होतील.. पत्रकारांची बाजू मांडतील ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई..दुपारी 1.30 ते 3 या वेळेत "*टीव्हीच्या पडद्यावरची दुनिया*" या विषयावरील चर्चेत प्रसन्न जोशी, विशाल परदेशी, प्रज्ञा पोवळे, श्वेता दांडेकर, सौरभ कोरटकर, विशाल पाटील सहभागी होत आपले अनुभव सांगतील. ..दुपारी 3 ते 5 या वेळात अधिवेशनाचा समारोप समारंभ होईल..शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे आणि मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.. एस.एम.देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.. समारोप समारंभात लातूर जिल्ह्यातील काही मान्यवर पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अधिवेशनास राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रमुख अनिल वाघमारे, विभागीय सचिव तसेच अधिवेशन मुख्य संयोजक सचिन शिवशेट्टे, रवी उबाळे, मराठवाड्याचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, उदगीर तालुका मराठी पत्रकार परिषदेचे  अध्यक्ष युवराज धोतरे , लातूर जिल्हा डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष बिभीषन मद्देवाड , पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे  निमंत्रक अर्जुन जाधव ,जिल्हा डिजिटल मिडीयाचे सचिव सिद्धार्थ सुर्यवंशी तसेच परिषदेचे सर्व उपाध्यक्ष, विभागीय सचिव आणि कार्यकारिणी सदस्यांनी य
 केले आहे.......

***

Post a Comment

0 Comments