बेटावद .
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सध्या मतदार याद्यांच्या मॅपिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे तालुक्यात इतर ठिकाणी ५० ते ७५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असताना, बेटावद तालुका शिंदखेडा येथील भाग क्रमांक ३३० मध्ये मात्र अद्याप कामाला सुरुवातही झालेली नाही या भागासाठी अद्याप बी.एल.ओ. (BLO) ची नियुक्ती न झाल्याने मॅपिंगचे काम पूर्णपणे रखडले असून, येथील नागरिक मतदानासारख्या मूलभूत हक्कापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे
मॅपिंग प्रक्रियेचा हा शेवटचा महिना सुरू आहे. भाग ३३० हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून मतदारांची संख्याही लक्षणीय आहे मोजकेच दिवस शिल्लक असताना अद्याप बी.एल.ओ. नसल्याने वेळेवर काम कसे पूर्ण होणार
इतर भागांचे काम अंतिम टप्प्यात असताना प्रशासन भाग ३३० च्या बाबतीत इतके उदासीन का, असा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे
जर वेळेत मॅपिंग पूर्ण झाले नाही आणि त्यामुळे भाग क्र. ३३० मधल्या नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागले, तर याला जबाबदार कोण? असा खडा सवाल बेटावदच्या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे
याबाबत जिल्हाधिकारी मा. भाग्यश्री विसपुते मॅडम व शिंदखेडा तहसीलदार मा. नितीन देवरे यांनी स्वतः लक्ष देऊन त्वरित बी.एल.ओ. ची नियुक्ती करण्यात भाग पाडावे, अशी मागणी बेटावद भाग क्रमांक ३३० मधील नागरिकांनी केली आहे.
0 Comments