Header Ads Widget

🚨 शिरपूर–शिंदखेडा तालुक्यात शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा उघडSIT चौकशीत 12 संस्थांमधील 27 शिक्षक-कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात

शिंदखेडा (प्रतिनिधी):
शिरपूर–शिंदखेडा तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवणारा मोठा घोटाळा विशेष तपास पथक (SIT) च्या चौकशीत उघडकीस आला आहे. तब्बल 12 शिक्षण संस्थांमधील 27 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधितांची नावांसह यादी जाहीर करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
चौकशीत बोगस नियुक्त्या, बनावट कागदपत्रांचा वापर तसेच शालार्थ आयडी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्यामागे संस्थाचालक, प्रशासकीय अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
SIT ची चौकशी अंतिम टप्प्यात असून, दोषींवर निलंबन, सेवेतून बडतर्फी तसेच फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधितांवर कारवाईची तलवार लटकत आहे.

📋 घोटाळ्यात समोर आलेल्या संस्था व संबंधितांची यादी:

1) किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर
ज्योतिबा फुले हायस्कूल, वॉर्ड नं. 3
सुनील साहेबराव पाटील
कुंभार गुरुजी हायस्कूल, वाघाडी
रोहन रविंद्र शिंदे

2) द शिरपूर एज्युकेशन सोसायटी
आर.सी. पटेल प्रायमरी स्कूल, वॉर्ड नं. 6
अरुण भिकन हाटेडकर

3) जनता विद्या प्रसारक संस्था, भटाणे
नूतन विद्यालय
बाळू राहुल संजय
दरबारसिंग रामसिंग गिरासे
साळुंखे राजपाल प्रताप
योगेश रोणपुड साळुंखे

4) तापी परिसर विद्या प्रसारक संस्था, तर्हाडी
हायस्कूल
उज्ज्वला सुभाष भामरे

5) जनता विद्या प्रसारक मंडळ, शिंदखेडा
जनता हायस्कूल
अमोल सुरेश देवरे

6) पाटणगाव पंचमंडळ, पाटण
आशापुरी शिंदखेडा हायस्कूल
अनिल पुंजाजी चोरे
भरत मधुकर बोर्से
बाळासाहेब प्रतापराव भामरे
दिपाली परेश बोर्से
प्रशांत जगदीश मराठे
पंकज सज्जनराव कोठाळकर

7) माध्यमिक शिक्षण समिती, वालखेडा
ए.आर. पाटील हायस्कूल
राहुल गुलाबराव पाटील
कैलास किशोर पाटील

8) नरडाणा शिक्षण प्रसारक मंडळ
विकास विद्यालय, नरडाणा
दीपक रावसाहेब वाघ
मनोज जयवंतराव शिंदे
प्रेरणा सत्यजित सिसोदे
रश्मा गौरव ठाकरे

9) रवीकन्या शिक्षण प्रसारक मंडळ, लोणगाव
रवी कन्या माध्यमिक विद्यालय
प्रशांत अंबादास भोये
राजेंद्र कांतीलाल पाटील

10) विधायक शिक्षण समिती, पाष्टे
साने गुरुजी हायस्कूल
सुनील गुलाब पाटील

11) ज्ञानोपासक शिक्षण मंडळ, दोंडाईचा
वाल्मिक ऋषी हायस्कूल, तावखेडा
धर्मराज भीमराव कोळी
इंदिरा गांधी हायस्कूल, कर्ल
देवरे गजानन युवराज

12) दोंडाईचा एज्युकेशन सोसायटी
अंजली उर्दू हायस्कूल, वॉर्ड नं. 2
मोहम्मद नदीम मोहम्मद युसुफ मण्यार

⚠️ निष्कर्ष:
या घोटाळ्यामुळे शिरपूर–शिंदखेडा तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. SIT च्या निष्कर्षानंतर आता प्रशासनाकडून कडक आणि उदाहरणार्थ कारवाई होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments