अमळनेर- तालुक्यातील सातरी हे गाव पाडळसे धरणाच्या पाणीसाठा क्षेत्रात येत असल्याने त्याचे पुर्नवसन करण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रश्न गेल्या विस वर्षांपासून प्रलंबीत आहे. याबाबत निंभोरा ता अमळनेर येथे काही गावकऱ्यांची मा. खा. विजय नाना पाटील यांच्या सोबत पंधरा दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. त्यात पुर्नवसना बाबत गावात दोन गट असल्याचे निर्दशनास आले. मा. खा. विजय नाना पाटील यांच्या सोबत खेडी येथील कार्यकर्ते श्याम पवार व अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुरेश दादा पाटील हे देखील उपस्थित होते. गावाच्या पुर्नवसन संदर्भातील वाद न्यायालयात पोहचला असून दोन्ही गटाकडून उच्च न्यायालयात दावे दाखल करण्यात आले आहेत.
हा वाद आपसात मीटविण्यासाठी मा. खा.विजय नाना पाटील व माजी मंत्रि अनील दादा पाटील यांच्यात चर्चा झाली असून या चर्चेतून सातरी गावाच्या पुर्नवसनाचा मार्ग लवकरच मोकळा होईल असे चित्र तयार झाले असून त्याला लवकरच मुहुर्त मिळेल असे दिसते.
0 Comments