शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- येथील तहसील कार्यालयाजवळील नियोजित जागेवर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती विविध कार्यक्रमानी साजरी करण्यात आली. सुरवातीला सकाळी नऊ वाजता सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. प्रास्ताविक प्रा.मधुकर मंगळे तर प्रा. निरजंन वेन्दे यांनी बुद्ध वंदना म्हटली.त्यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अभिमन पाटोळे, उपाध्यक्ष बन्सीलाल बोरसे, सचिव प्रा. निरजंन वेन्दे,सदस्य नानाभाऊ पाटोळे, संजय पाटोळे,बाबुराव पानपाटील, प्रा. मधुकर मंगळे,अनिल बोरसे, कायदेशीर सल्लागार एडव्होकेट.अरविंदकुमार मंगासे, एडव्होकेट. चंद्रकांत बैसाणे, सामाजिक कार्यकर्ते न्हानभाऊ बोरसे सर्व पदाधिकारी सह महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री व पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अभिवादन केले.नगराध्यक्षा कलावती माळी, उपनगराध्यक्ष उदय देसले, माजी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, माजी उपनगराध्रक्ष भिला पाटील, प्रकाश आप्पा देसले,कृउबा सभापती नारायण पाटील, जिल्हा चिटणीस डी. एस. गिरासे,माजी जि. प. सदस्य पंकज कदम,तहसीलदार नितीनकुमार देवरे, नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, विपुल साळुंखे, सर्व नगरपंचायत विषय समिती सभापती व नगरसेवक यांच्या सह शहरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकिय पदाधिकारी व कार्यकर्ते आणि बुद्ध अनुयायी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्प अर्पण करित अभिवादन केले. त्यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील गरजु होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.दुपारी ग्रामीण रुग्णालयात रुग्णाना फळ वाटप करण्यात आले. संध्याकाळी भव्य दिव्य मिरवणूक कॉलनी परिसरातून निघाली. सदर मिरवणूकीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नियोजित जागेवर करण्यात आला. सदर मिरवणुकीत डॉ. बाबासाहेबाचे अनुयायी पुरुष, महिला, तरुण तरुणी यांनी मनमुराद आनंद लुटला.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आकर्षक विदयुत रोषणाई केली होती.हयावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांचा उत्सव समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. श्री. रावल यांनी मंजुर केलेल्या डॉक्टर बाबासाहेबाचे भव्य दिव्य स्मारकाचे प्रगतीपथावर असुन सत्तर ऐशीं टक्के पुर्णत्वास आल्याने श्री. रावल यांनी समाधान व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब हे ज्ञानसागर होते, आपल्या तरबेज बुद्धीच्या जोरावर जगात नाव झाले सर्वच उपेक्षित पिडीत घटकांकरिता जीवन वाहुन संविधान दिले. म्हणून आजच्या युवा पिढीने डॉ. बाबासाहेबाच्या विचार आपल्या मनात रुजवावे असे प्रतिपादन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी केले. जयंती उत्सव यशस्वीतेसाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य कायदेशीर सल्लागार यांनी शिस्त बद्ध नियोजनातुन परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.
0 Comments