शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी-- धुळे जिल्हा नियोजन समितीच्या आधीच २३ पैकी २२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. केवळ एका जागेवर शिंदखेडा व साक्री नगरपंचायत प्रतिनिधी उमेदवार साठी मतदान घेण्यात आले. त्यात
भाजपचे शिंदखेडा नगरपंचायत चे गटनेते तथा सभागृह नेते अनिल लालचंद वानखेडे तर साक्री चे सुमित ज्ञानेश्वर नागरे रिंगणात होते.त्यात शिंदखेडा नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांचा दणदणीत विजय तर साक्री चे सुमित नागरे यांचा पराभव झाला. शिंदखेडा नगरपंचायत चे 18 पैकी 16 मतदारांनी मतदान केले तर साक्री येथील 17 पैकी 12 मतदारांनी मतदान केले असे एकूण 28 मते मतपेटीत बंद झाली तर आज सकाळी निकाल दरम्यान 28 पैकी 28 मते रावसाहेब अनिल वानखेडे यांना मिळाली तर समोरचे सुमित नागरे यांना एकही मत मिळाले नाही साक्री चे सुमित नागरे स्वतः रिंगणात असताना मतदान केलेच नाही. ह्यावरुन फक्त निवडणूक लावुन शासनाचा वेळ व पैसा वाया का घालवतात. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य जनता आपणास निवडुन त्या पदाला लायक बनवितात आणि आपण खुशाल पदाचा दुरुपयोग करून नाहक शासनाची दिशाभूल करत आहेत म्हणून निवडणूक आयोगाने ह्या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालावे आणि अशा लोकप्रतिनिधी ना धडा शिकविण्याची गरज आहे असा सुर सर्वसामान्य जनतेतुन निघत आहे. शिंदखेडा येथील रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या विजयाचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून सामाजिक माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना अत्यंत संयमी, हसतमुख सर्व सामान्य माणसाला जवळ करुन आपलेसे करणारे अभ्यासु व्यक्तीमत्व विकास पुरुष शिंदखेडा शहरात नव्हे तर जिल्ह्यात चर्चेत राहिले आहेत. माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध विकासकामे केली आहेत . त्यांच्या ह्या यशाबद्दल भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य व नेते कामराज निकम, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, तालुकाध्यक्ष आर.जी.खैरनार , शहराध्यक्ष प्रवीण माळी, नगराध्यक्षा रजनीताई अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश नागो देसले, भिला बारकु पाटील, युवराज माळी, सुभाष माळी, उल्हास देशमुख, भायुविमो जिल्हाध्यक्ष सुरज देसले , अँड. विनोद पाटील चेतन परमार, प्रवासी आघाडीचे दादा मराठे, चंद्रकांत सोनवणे,आर.एच.भामरे, नगरसेवक किसन जगन सकट, उदय देसले, नगरसेविका निर्मला युवराज माळी, योगिता विनोद पाटील, वंदना चेतन परमार, भारती जितेंद्र जाधव, नर्मदा अर्जुन सोनवणे, मिरा मनोहर पाटील, संगीता चंद्रकांत सोनवणे, स्विकृत नगरसेवक अरुण भिकनराव देसले यांसह भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देऊन फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला. शेवटी माझ्या वर पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडत असताना मला नेहमीच पक्षातील पदाधिकारी व तळागाळातील कार्यकर्ते च्या सहकार्याने माझ्यावर विश्वास ठेवुन आजचा विजय आहे. हा विजय माझ्या विश्वास सहार्यचेचा ऐतिहासिक आहे.तो मी कधी विसरू शकत नाही.सर्वाचे याप्रसंगी आभार व्यक्त केले.असे धुळे जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य अनिल वानखेडे यांनी सांगितले.
0 Comments