Header Ads Widget

*शिंदखेडा येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व जल्लोष कार्यक्रम उत्साहात*




शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी-- येथील शिंदखेडा तालुका  एज्युकेशन ट्रस्ट संचालित गर्ल्स हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व जल्लोष 


कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या जेष्ठ संचालिका श्रीमती शैला रमेश देसले यांच्या हस्ते करण्यात आले.हयावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सुनील भाबड, शिंदखेडा तालुका 


एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष स्वप्निल रमेश देसले, उपाध्यक्ष हसनभाई बोहरी सचिव आनंदा चौधरी संचालक प्रा प्रदीप दिक्षित, दिपक देसले, आधार आबा पवार, डॉ. एस.एन.बागुल, डॉ. एन.पी.पाटील, मोतीलाल पवार, चंद्रशेखर चौधरी, गिरीश भाई शाह, माजी उपाध्यक्ष आवेदीन भाई नोमानी, अँड. अजय पवार, मुख्याध्यापक 


जे.टी.पाटील, स्नेह संमेलन प्रमुख के.के.चौधरी उपस्थित होते. ह्यावेळी अहिराणी, मराठी, हिंदी गितांवर मुलींनी नृत्य सादर केले. शेतकरी नवरा, झुमकावाली पोरं नदी तळीले जाय, हम इंडियावाले, माय भवानी,गुलाबाची कळी कशी हलदिने माखली, छबीदार छबी, बोल वाजया आदिवासी नृत्य आदी नृत्य प्रेक्षकांची मने जिंकली. समाज प्रबोधनात्मक अहिराणी मराठी नाटिकेत मोबाईल चे दुष्परिणाम, आमला पोरले दखाला उना पावणा ह्या नाटिकेद्वारे संदेश देण्यात आले. विद्यार्थ्यांनीना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी गर्ल्स हायस्कूल नेहमीच शिस्तबद्ध व कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही असा पवित्रा घेत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. असे मुख्याध्यापक के.टी.पाटील यांनी सांगितले. सुत्रसंचलन के.टी.परदेशी , महाले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments