Header Ads Widget

उज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर जाधव नगर शिंदखेडा या शाळेत दोन दिवसीय चालणाऱ्या आंतरशालेय कार्यक्रमाची सांगता आनंद मेळावा उत्साहात साजरा करून करण्यात आली*




शिंदखेडा---*आज दिनांक 21 जानेवारी 2023 वार शनिवार रोजी 
 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व  व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी, खास करून खवय्येगिरी करणाऱ्यांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात 22 विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्य वस्तू  आपल्या पालकांच्या मदतीने बनवून विक्रीसाठी आणल्या होत्या. विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही अतिशय चांगला प्रतिसाद व सहभाग नोंदविला. लहान विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या घरगुती खाद्य वस्तूंचा सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मनमुराद  आनंद घेतला. यावेळेस श्री स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे व निवासी मूकबधिर विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांनीही खवय्येगिरीसाठी सहभाग नोंदविला.
 या कार्यक्रमाच्या अगोदरच्या दिवशी शाळेत विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन  करण्यात आले होते. त्यात संगीत खुर्ची, लिंबू चमचा, स्लो सायकलिंग, चॉकलेट उडी, 100 मीटर धावणे, लांब उडी, गोणपाट उडी व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षकांनीही संगीत खुर्ची मध्ये सहभाग नोंदवून आनंद घेतला.स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस देण्यात आले.
  सदर दोन दिवसीय कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासो डॉ.आर.आर.पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे  कार्यकारी अध्यक्ष श्री अनिल पाटील सर यांनी भुषविले. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर व पालकांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली  प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री उज्वल पाटील सर, श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम डी पाटील सर, निवासी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस.आर.पाटील सर  उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित पालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनामुळे विद्यार्थी खुश होते व पालकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ठाकूर सर व आभार प्रदर्शन श्री मनोज सोनवणे सर यांनी केले.तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. आशा माळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली  श्रीमती.हिरे मॅडम, श्रीमती.काटे मॅडम, श्री दिपक पाटील सर, श्रीमती साळुंखे मॅडम, श्री देसले सर,यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी  उज्वल शैक्षणिक संकुलातील सर्व सहकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments