शिंदखेडा (यादवराव सावंत )-
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीधर गटातील दहा जागांसाठी निवडणूक येत्या 29 जानेवारी रोजी होणार असून विद्यापीठ विकास मंच पॅनल तर्फे सर्वच्या सर्व दहा जागा लढवण्यात येणार असून निवडणुकीच्या
प्रचाराचा शुभारंभ आज श्री.काशी विश्वेश्वर महादेव मंदीर शिंदखेडा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय संघचालक हितेंद्र जैन, भाजपाचे जेष्ठ नेते कामराज निकम, तालुका कार्यवाह केशव माळी, शिंदखेडा न.पं. चे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, डाॅ.रविंद्र देसले, सुभाष माळी, नगरसेवक उदय देसले, अरुण देसले, चेतन परमार, सूरज देसले, जितेंद्र जाधव, डॉ.देवेंद्र पाटील, उल्हास देशमुख, ऍड.वसंतराव पवार, दिनेश सूर्यवंशी, प्रा.प्रदीप दीक्षित, गणेश मराठे, प्रकाश मराठे, गोविंद मराठे, परेश देसले, चुडामन बोरसे, अशोक गिरनार, सुमित जैन, अमित वाधवा, महेंद्र बच्छाव, जयवंत शिंपी, संदीप पारख, हर्षल पाटील, बाळू गिरासे, गोपाल चौधरी, राजेंद्र मराठे, प्रवीण माळी, विद्यापीठ विकास मंचचे खुल्या प्रवर्गातील उमेदवार व माजी सिनेट सदस्य अमोल मराठे, तालुका प्रमुख संदीप चौधरी, योगेश देसले, अनिल मराठे, अमोल मराठे, भूषण पवार, विनोद देसले, हर्षल मराठे, इ. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ वाढवून करण्यात आला. विद्यार्थ्यांचा आणि विद्यापीठाचा विकास हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात रचनात्मक काम करणारे कार्याप्रति एकनिष्ठ, विद्यापीठासाठी वेळ देऊ शकणारे, भविष्याचा वेध घेणारे उमदीचे आणि धडाडीचे कार्यकर्ते या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचने उमेदवार दिले आहेत. या सर्व दहा उमेदवारांना प्राधान्य क्रमाने मतदान करून विजयी करावे असे विनम्र आवाहन याप्रसंगी कामराज निकम यांनी सर्व मतदारांना व हितचिंतकांना केले. त्यानंतर श्री अमोल मराठे सर मा.सिनेट सदस्य यांनी सर्व उपस्थितांना मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.
0 Comments