माईसाहेब लता रोहिदास पाटील यांच्या हस्ते ग्रंथांचे पूजन करण्यात आले. खान्देश संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या या दिंडीत सहभागी झालो. खान्देशचं कुलदैवत कानबाई, गुलाबाई, गवराई, भगत आणि डाणक्या, आदिवासी नृत्य, भजन, व्हल्लर वाजंत्री, देव आणणे, मांडव बैलगाडी, तगतराव असे विविध देखावे आणि कलाकारांच्या विविध कलागुणांनी संपन्न या दिंडीने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले. या ग्रंथदिंडी शुभारंभ प्रसंगी माजी आमदार प्रा शरद पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामभाऊ सनेर, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, शिवसेनेचे पदाधिकारी डॉ सुशील महाजन, अहिराणी साहित्यिक डॉ रमेश सूर्यवंशी, कृष्णा पाटील, संमेलन अध्यक्ष रमेश बोरसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अहिराणी भाषेवर प्रेम करणारी मंडळी उपस्थित होती.
0 Comments