Header Ads Widget

*राजपथ रस्ता खालुन पाईप लाईन फुटली बस स्थानक परिसरात पाण्याची नासाडी!




 दोंडाईचा शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून गेल्या वर्षी नागरिकांना शुद्ध बिसलरी फिल्टर पाणीपुरवठा करणारी शासनाची २१ कोटी रुपयांचा निधीतुन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नविन पाईप लाईन टाकून फिल्टर पाणीपुरवठा करण्यात येत असतांना गेल्या आठ दिवसापासून बस स्थानका समोर पाईप लाईन फुटल्याने पाणीपुरवठा सुरु होतो.तेव्हा हजारो लिटर पाण्याची नासाडी होऊन पाणी बस स्थानक परिसरात वाहत आहे.मुख्य स्टेशन भागात १७ कोटी रुपये खर्च करुन काँक्रिटचा राजपथ रस्ता तयार केला.रस्ता मजबूत व टिकाऊ असल्याने स्टेशन भागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन राजपथ रस्त्याच्या खालुन गेली आहे.रस्ता मजबूत व टिकाऊ होणार म्हणून स्टेशन भागाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईनही मजबूत व टिकाऊ असेल परंतु हि पाईपलाईन एक ते दिड वर्षाच्या आत फुटली शहरात तीन दिवसा आड पाणीपुरवठा होतो.पाणीपुरवठा सुरु झाला की फुटलेल्या पाईप लाईन मधुन बस स्थानक परिसरात पाणी वाहून जात असल्याने बस स्थानक परिसरात हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याची नासाडी तर होत आहे.परंतु पाण्यामुळे १७ कोटी रुपयांचा राजपथ रस्ताही खराब होण्याची शक्यता आहे. व पाणी पुरवठा बंद झाला की तेच रस्त्याचे पाणी पुन्हा पाईपलाईन मध्ये जाते.त्यामुळे लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.तरी राजपथ नावाचा विचार करुन नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाने फुटलेली पाईप लाईन दुरुस्त करुन पाण्याची नासाडी बंद करावी.

अहिल्या न्युज मिडीया*साभार

Post a Comment

0 Comments