शिंदखेडा ( यादवराव सावंत)- प्रतिनिधी - येथील भोईराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोट्यवधी रुपयांचा भष्टाचार उघडकीस आला आहे. त्यानुसार आजपासून भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या माध्यमातून शहरातील सर्व ठेविदार व खातेदार यांचे पैसे परत मिळावे यासाठी शिंदखेडा तहसील कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी आजअखेर ठेविदारांना ठेवी मिळाली नसल्याने अखेर २६ जानेवारी ला प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोर सामुहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदखेडा शहरातील भोईराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोट्यवधी रुपयांचा भष्टाचार उघडकीस आला असून, त्यात मॅनेजर सुनील वाडिले व संचालक मोकाट फिरत आहेत आमचे कुणीही काहीही करू शकत अशा आविर्भावात ठेविदारांना धम देत तुमचे पैसे नाही मिळणार आमची लाईन मोठी आहे असे वागत आहेत. म्हणून संतप्त झालेल्या ठेवेदारांनी आधीच तहसीलदार तसेच सहाय्यक निबंधक संजय गिते व प्रशासक यांना निवेदन दिले होते म्हणून सबुरीचा मार्ग निश्चित करण्यासाठी मागील आठवड्यात सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी प्रशासक कोकणी व भिल समाज विकास मंचचे अध्यक्ष दिपक अहिरे व ठेविदार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आठ दिवसांच्या आत कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले असताना कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.मॅनेजर व संचालक मंडळ मोकाट फिरत आहेत म्हणून त्यांच्या वर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी हयाद्वारे ठेविदारांनी केली होती. मॅनेजर व संचालक मंडळाच्या नाते संबंधातील लोकांना मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले आहे. म्हणून त्यांच्या वर जप्ती ची कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली होती. निर्णय असफल झाल्याने अखेर भिल समाज विकास मंचचे अध्यक्ष दिपक अहिरे सह ठेवेदार खातेदार यांनी २६ जानेवारी ला सामुहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्यावेळी अध्यक्ष दिपक अहिरे, सुनील सोनवणे, श्रावण मराठे, चंद्रकांत सोनवणे, बानुबाई भिल, हिराबाई परदेशी, शोभा कनोजिया,पानाबाई भिल, महेंद्र परदेशी, प्रकाश देवरे, रोहित परदेशी, प्रवीण मोरे, किशोर चौधरी, देविदास शिंपी,गोलु कनोजिया,मिठाराम बडगुजर, दुर्गाबाई बडगुजर,शरद बडगुजर, पुष्पाताई बडगुजर यांसह सर्व ठेविदार हजर होते. ह्या पुर्वी जिल्हाधिकारी धुळे व पोलिस अधीक्षक धुळे तसेच पोलिस निरीक्षक शिंदखेडा यांना पत्राद्वारे कळविले आहे.
0 Comments