Header Ads Widget

*शिंदखेडा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक सुनील भाबड तर गांधी चौकात माजी सैनिक भुषण पवार यांनी केले ध्वजारोहण*




           शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी -- येथील पोलिस स्टेशनमध्ये आज सकाळी आठ वाजता पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संचलन पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, प्रशांत गोरावडे,रवींद्र केदार सह पोलीस कर्मचारी यांनी केले.   


                         *गांधी चौकात माजी सैनिक भुषण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण*   शिंदखेडा शहरातील गांधी चौकात दरवर्षी ध्वजारोहणाचा मान स्वातंत्र्य सैनिक किंवा माजी सैनिकांना देण्यात येतो. आज सकाळी साडेनऊ वाजता तेवीस वर्षे देशसेवा करुन परत आलेले माजी सैनिक तथा शौर्य अकादमी चे अध्यक्ष भुषण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ह्यावेळी खानदेश रक्षक ग्रुप चे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, कार्याध्यक्ष नंदलाल साळुंखे, संजीव नगराळे, प्रमोद गुरव, नितीन मिस्तरी, शांताराम जाधव , यांच्या सह दिपक देसले सुनील चौधरी, नगरसेवक दिपक अहिरे, मिला पाटील, उदय देसले, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण माळी, दादा मराठे, विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन दगा बापू चौधरी, पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन विजय नाना चौधरी,  सह पदाधिकारी व शेतकरी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments