Header Ads Widget

*निशाणा तुला जमला ना,वाईट डोळा-वाईट नजर...* *अखेर अग्रवाल धर्मशाळा सरकार जमा...* *तीस वर्षांनंतर सुखद निकाल..‌.*


*गावातील इतर ओपन प्लेस बाबतही भविष्यात जनतेला चिंता...*


*जनमत-*


*दोंडाईचा-* येथील अनेक वर्षापासुन चर्चेत असलेल्या अग्रवाल धर्मशाळेचा निकाल अखेर सरकार बाजूने लागल्याने, तीस वर्षापासुन न्यायाचा प्रतीक्षेत असलेल्या गावातील अनेकांना उशीरा का असेना सुखद दिलासा मिळाला आहे.या निकालामुळे भविष्यात  सरकारी जागा व गावातील ओपन प्लेसला आपल्या बापाची जहागीर समजणार्‍या लॅड माफिया-प्राॅपर्टी दलाल-पैशाने स्व:ताला करोडपती-पुंजीपती व लोकसेवा-समाजसेवा माध्यमातुन जमिनी लाटणार्‍यांना मोठी आर्थिक चपराक बसली आहे.म्हणुन अनेकांच्या जमिनीबाबत वाईट डोळा-वाईट नजर असणाऱ्यांना अग्रवाल धर्मशाळा सरकार जमा झाल्यावर, निशाणा तुम्हाला जमला ना- असेच गावात चारचौघे व्यापारी-दुकानदारात म्हटले जात आहे. म्हणुन येणाऱ्या काळात गावात ज्या अर्ध शतकाच्या वरती ओपन प्लेस आहेत, त्याही कोणी अशाच पद्धतीने हडप तर नाही करणार, हा गाववाल्यांना चिंतेचा विषय सध्या परिस्थितीवर झाला आहे.


अग्रवाल धर्मशाळेचा विषय पाहिला तर स्टेशन भागातील महादेव मंदीर शेजारील,भर रहदारीच्या- दळणवळण भागातील-क्रीम समजला जाणारा रहिवासी एरियातील सर्वात महागडा-पुणे-मुंबई सारखा जमिनीला भाव असणारा एरिया-जागा होय. ह्या जागेजवळ सर्वच म्हणजे बसस्टँड, रेल्वेस्टेशन, बँका, दवाखाने,बाजारपेठ,कुषी उत्पन्न बाजार समिती, तहसील कार्यालय, एम.एस. ई.बी.कार्यालय, नगरपालिका,शाळा, महाविद्यालये यासह इतरही बरीच  दैनंदिन माणवाला गरज असणाऱ्या सर्वसोयी युक्त महागडा एरिया म्हटला तरी हरकत नाही.त्यामुळे ह्या जागेवर जमिनीचे दलाल-व्यापारी-व्यवसायिक- धनाढ्य-राजकीय मंडळीसह जवळपास सर्वांच्या जमिन घशात लाटणाच्या वाईट नजरा लागुन होत्या.अनेकांनी तर एक्सवाय झेड व्यक्तींकडून हस्तांतर-सौदेपावती करून शासनस्तरावर वरपासुन खालपर्यंत मीच मालक आहे, ह्या अभिर्भावात गावात मिरवत होते.जसे ही मिळकत‌ त्यांच्या बापाची झाली आहे.पण ही जागेचा म्हणजे अग्रवाल धर्मशाळेचा इतिहास पाहिला तर १९३७ मध्ये अग्रवाल समाजाला तीस वर्षांच्या लिस-करारावर शासनाकडून जागा देण्यात आली होती.त्यानंतर १९५६ मध्ये सिटीसर्व्ह ऑफीस दोंडाईच्यात आल्यावर त्यांनी लिस-करारावरील एक्सवाय झेड व्यक्ती त्यातही जे हयात आहेत नाही आहेत,अशांची नावे नजरचुकीने लागली. त्यामुळे हयात असलेल्या व्यक्तींनाही वाटले की,आपणच ह्या जागेचे मालक होऊन गेलो आहोत.त्यामुळे त्यांनीही  तीस वर्षांनंतर पुढे कोणतीही कागदोपत्री हालचाल न करता, आलेल्या -भेटलेल्या प्रत्येकाला आपणच ह्या धर्मशाळेचे- जमिनीचे मालक आहोत,असेच भासवले.त्यानंतर सन २०१२ ला गावात स्टेशन भागातील सर्व बेकायदेशीर दुकाना काढण्यात आल्या. त्यामुळे अनेक लोकांना व्यापार -व्यवसायाला प्राईम स्पाॅट-जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे आहे त्या पडीत-बेरहिवासी जमीनी-बिल्डीगांना सोन्याचे भाव आले. त्यात आताचे साई टावर व तत्पुर्वीचे जुनी डी.डी.सी.बॅकेची बिल्डिंगकडे काही गावातील व काही बाहेरील आर्थिक वाईट नजर असणाऱ्या आर्थिक दलाली प्रवृत्तीच्या लोकांनी हव्या त्या किंमतीत बिल्डिंग खरेदी करून तेथे चार मजली व्यवसायिक व रहिवासी गाळे बनवून, विक्री एका स्क्वेअर फुटचे चारवेळा वरखाली म्हणजे एक स्क्वेअर फुट, लाख रुपये स्क्वेअर फुटांचा आत विकले गेल्याने सहाजिकच जमीन दलाली बाजारात बसलेल्या इतरांच्याही नजरा, ह्याच सोन्याचे भाव-अंडी देणाऱ्या जागेचा आजूबाजूला जागा शोधत होते.त्यात मग पडीत अग्रवाल धर्मशाळेकडे अनेकांच्या नजरा गेल्या.पण त्यात अनेकांना कागदोपत्री अडसर येत होता. कारण कागदोपत्री मालक दिसणाऱ्या काही हयात आणि मयत झालेल्या़ंच्या वारसांनी सन  १९९३-९४ मध्ये मालक मीच आहे.ह्या कारणास्तव न्यायालयात धाव घेतल्याचा दावा सुरू असल्याने काही जमिन दलाल तज्ञांनी सोदेबाजीतुन माघार घेतली.तर काही तज्ञ दलाल व स्व:ताला माजी मंत्र्यांचे फायदेशीर कबुतर समजणाऱ्याने पाचोरा येथे हयात असलेल्यांकडून जवळच्या व्यक्तीच्या नावाने खरेदीखत करून घेतले.त्यामुळे त्यांनी ही न्यायालयात येडीचोटीचा जोर लावून सरकारी जमीनीवर आपला मालकी हक्क दर्शविला. मात्र जमीन मालकी विवाद न्यायप्रविष्ट असल्याने अनेक तारखांना न्यायालयाबाहेर ह्या माजी मंत्र्याच्या स्व:ताला  फायदेशीर कबुतर समजणाऱ्याने  न्यायालयातुन आपल्याच बाजुने-अमुक-अमुक चिट्ठी -निकाल असाच-ह्या कारणास्तव आपल्या बाजीने लागेल,असे खोटं स्वप्न पाहण्याचे भाकीत केले. ते ऐकून गावातील अनेक सामंजस्य व निकालाकडे लक्ष ठेवून असलेल्यांना पैसा-पावरपुढे काही कोणाचे चालत नाही असे वाटत होते. पण आज दोन दिवसांपुर्वी जो निकाल आला.तो निकाल म्हणजे ही विवादीत जमीन सरकार जमा करण्याबाबत आल्याने, तीस वर्षांनंतर सर्वांना सुखद अनुभव आला व न्याय देवतेवर पुन्हा एकदा जनतेचा विश्वास दुर्ढ झाला आहे व जे लॅड माफिया-प्राॅपर्टी दलाल -पैशाने स्व:ताला करोडपती-पुंजीपती-समाजसेवा-जनसेवा माध्यमातुन ह्या जमिनीवर वाईट डोळा-वाईट नजरा लावून धरल्या होत्या.त्यांना *निशाणा तुला जमला ना-* असेच जनता उघड्या तोडांनी गावभर म्हणत आहे. म्हणुन येणाऱ्या काळात गावात अर्धशतक च्या वरती ओपन प्लेस आहेत,त्याही अशा वाईट प्रवुत्तीचे लोक बळकावण्याचा प्रयत्न करणार नाही,यांची शासनस्तरावर दखल घेतली जायला पाहिजे,अशी चिंता शेवटी जनता एकमेकांजवळ बोलून व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments