नंदुरबार (प्रतिनिधी) – आज सोमवार, दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने "स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखावा" या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी ठुबे मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक राष्ट्रध्वजांची विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि राष्ट्रीय ध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या प्रसंगी गोरक्षक श्री.भुषण पाटील, मयुर चौधरी, सुमित परदेशी, आकाश गावित तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे योगेश विसपुते उपस्थित होते.
0 Comments