Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यातील मेथी गावातील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण कर्ते ना पाठिंबा देण्यास गेलेल्या महिलांना महादेवाची जुनी पिंड आढळली. 👉 त्याच जागेवर महादेव पिंडाची स्थापना करण्याची मागणी*

                  शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- तालुक्यातील मेथी या ठिकाणी गेल्या नऊ दिवसापासून शेतकरी बांधव खदान रद्द झाली पाहिजे म्हणून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्या ठिकाणी आज दिनांक 13 /8 /2025 रोजी मेथी गावातील महिला उपोषणाला बसलेल्या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आले असता त्यांनी खदानीचे काम कशा पद्धतीने चालतं हे पाहण्यासाठी गेल्यावर तेव्हा त्यांना त्या खदानी मध्ये महादेवाची जुनी पिंड आढळून आली. म्हणून उपोषण कर्तै शेतकऱ्यांसहित सर्व मेथी परिसरातील नागरिकांची या पिंडाची स्थापना याच जागेवर झाली पाहिजे अशी मागणी केली. तसेच मेथी गावातील महिला वर्गानी विधीवत महादेव पिंडाची  पुजा करुन भजन, गाणी गायली. हयावेळी मेथी गावासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हयावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे सह कार्यकर्ते यांनी महादेव पिंडाची पुजा करून नारळ फोडण्यात आले. हयावेळी परिसर काही काळ भक्ती मय वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

0 Comments