असता जवळपास शोधाशोध केली असता, बुराई नदीच्या पात्रात सदरची दानपेटी रिकामी पडलेली आढळून आली. सदर घटनेची खबर शिंदखेडा पोलीस स्टेशन ला दिल्यावर घटनास्थळी पोलीसाचा ताफा रवाना झाल्याचे समजले त्यानुसार ट्रस्ट अध्यक्ष मंगलसिग गिरासे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, खजिनदार प्रकाश आप्पा देसले, सेवेकरी जगदीश राजपूत सह सर्व संचालक मंडळ प्रमुखांनी शिंदखेडा पोलीस स्टेशन ला सदरची चोरी घटना फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता फिर्याद नोदविण्याचे काम सुरु होते. नुकताच श्रावणी पर्व पंचकुंडीचा कार्यक्रम सोहळा झाल्याने भक्त भाविकांकडुन गुप्त दान मोठ्या प्रमाणात आली असता अज्ञात चोरट्यानी दानपेटीवर आधीच लक्ष असल्याचा अंदाज असुन संधी पाहून काल रात्री मंगळवारी बारा आगष्टला दानपेटी चोरी करून पसार झाले.शोधाशोध केल्याने नजीकच बुराई नदी पात्रात रिकामी दानपेटी आढळून आली. चोरटे दैवधर्माला सोडत नाही ही या मंदिरात दुसऱ्यादा चोरी झाल्याचे ट्रस्टीनी सांगितले. म्हणून चोराना चांगलेच फावले आहे.पोलिसांनी कसुन चौकशी तपास करून सदरील अज्ञात चोरट्याचा शोध लावावा अशी मागणी मंदिर ट्रस्टी केली आहे.सध्या शिंदखेडा परिसरात दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढले असुन चोरट्याचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.
0 Comments