Header Ads Widget

*मालपूर येथील क्षेत्रिय भावसार समाज मंदिरात श्रीमद भागवत कथा सुरु*

मालपूर प्रतिनिधी. 
 
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे अमरावती नदीच्या मध्येभागी वसलेले आणि पुरातन300 वर्षापासून चे क्षेत्रीय भावसार समाजाचे हिंगलाज मातेचे सुशोभित असे मंदिर आहे तेथे अखंड भागवत कथेचे वाचन प्रवचन होत असते. या कथेचे वाचक ह. भ. प. श्री. उमेश विलास जी महाराज नगरदेवळाकर यांच्या उत्तम अशा वाणीतून मालपूरकरांना भागवत कथेचे शुद्ध मराठी भाषेतून ऐकण्यास मिळत आहे. 
आजचे हे दुसरे पुष्प होते ही कथा सात दिवस चालणार आहे. भागवत कथेचे श्रोतेगण भावसार समाजाचे पुरुष व महिला मंडळी रविंद्र भावसार, प्रकाश भावसार, पत्रकार प्रभाकर आडगाळे, दिपक भावसार, सखाराम धनगर ,हरी महाजन, दौलत महाजन ,आदि उपस्थित होते. ही कथा दोन सत्रातून होते सकाळी 9 ते 12 दुपारी 3 ते6. होत असते . आजचे आरतीचे मानकरी दादासाहेब रावल महाविद्यालयाचे परिवेक्षक श्री श्याम भावसार हे लाभले होते प्रथम गणपतीची आरती तदनंतर श्रीमद भागवत ची आरती,  व हिंगलाज मातेची आरती करून केथेचे सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments