Header Ads Widget

कुरुकवाडे भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी होत नसल्याने आमरण उपोषणाची नोटीस




-----------   ------------------------
शिंदखेडा ( प्रतिनिधी ) शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे ग्राम पंचायत भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी व उपोषण करूनही चौकशी झाली नाही याप्रकरणी पुनश्च उपोषण करणार असल्याची नोटीस शायमकांत पाटील यांनी पस गटविकास अधिकारी यांना दिली आहे
       सविस्तर माहिती अशी की ग्राम पंचायत कुरुकवाडे यांच्या माध्यमातून महात्मा गांधी सिंचन विहीर घेण्यात आली यासह जीप प्राथमिक शाळा व गुरचरण बाबतीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी सन 2019 पासून सातत्याने करीत आहे मात्र चौकशी होऊन कार्यवाही होत नाही या मागील गूढ काय असावे हे मात्र निश्चित वरील प्रकरणी माजी आ रामकृष्ण पाटील यांच्या लेतरप्याडवर निवेदन देऊन भेटही घेतली ग्राम विकास मंत्री यांनाही निवेदन दिले तट प्रतिही मी जीप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही दाखल केले सदर प्रकरणी चौकशी व्हावी यासाठी नोव्हेम्बर 2019 मध्ये उपोषणास बसलो प्रसंगी चौकशी बाबत लेखी आश्वासन गट विकास अधिकारी पस शिंदखेडा यांनी दिले मात्र आज पावेतो साधी दखलही घेतली गेली नाही सदर प्रकरणी सादर केलेला अहवाल अपूर्ण असल्याचे मला लेखी कळवले आहे सदर बाबतीत मी अवघ्या दहा मिनिटात भ्रष्टाचार कसा झाला आहे हे निदर्शनास आणू शकतो असे श्यामकांत पाटील यांनी उपोषण बाबत नोटीसीत नमूद केले आहे याबाबत 14 जानेवारी 2021 पावेतो चौकशी व्हावी असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जीप धुळे यांना दिले आहे व चौकशी होऊन कार्यवाही न झाल्यास 25 जानेवारी 2021 पासून आमरण उपोषणास बसण्याबाबत नमुद केले आहे याबाबतच्या प्रति हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री यासह लोकायुक्त कार्यालय मुबंई जिल्हाधिकारी धुळे गटविकास अधिकारी पस शिंदखेडा यांनाही पाठवल्याची नोंद केली आहे


Post a Comment

0 Comments