Header Ads Widget

छावा संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी नितीन पाटील नियुक्त

छावा संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी नितीन पाटील नियुक्त

अमळनेर(प्रतिनिधी)- जळगाव येथे अखिल भारतीय छावा संघटनेची सहविचार सभा आयोजित करण्यात आलेली होती. 
यात अमळनेरचे नितीन पाटील यांची तालुकाध्यक्ष पदी तर गोरख  पाटील यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळेस नियुक्तीपत्र देताना छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भीमराव मराठे, जिल्हा निरीक्षक आर.व्ही. पाटील सर, जिल्हाध्यक्ष संतोष मराठे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नंदू पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष विजय पाटील, एरंडोल तालुकाध्यक्ष उमेश पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष राजू अण्णा पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने छावा संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
सदर निवड झाल्याबद्दल आमदार अनिल भाईदास पाटील, जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील, तालुकाध्यक्ष सचिन बाळु पाटील सह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments