Header Ads Widget

डॉ.मोरे आणि डॉ.वाडेकर, दोघा डॉक्टरांना कारवाईचा डोस हजार रुपयाचा मोह नडला; एसीबीने रंगेहात पकडले



मानधनाचे बिल मंजुर करण्यासाठी हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोघां लाचखोर डॉक्टरांना एसीबीने कारवाईचा डोस पाजला आहे. आज दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघां डॉक्टरांना प्रत्येकी हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले आहे.या कारवाईमुळे लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
शिंदखेडा तालुक्याच्या नरडाणा येथील प्राथमिक
आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत
असलेल्या तक्रारदाराने त्याने केलेल्या एनआर एचएम अंतर्गतच्या कामाच्या मानधनाचे १७ हजार रुपयांचे बिल मंजुर करण्यासाठी आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भुषण पंडीत मोरे (वय ३४) रा.वर्षी ता.शिंदखेडा आणि डॉ.पंकज बारकु वाडेकर रा.दत्त कॉलनी साईमंदिराजवळ देवपुर,धुळे यांनी प्रत्येकी हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाच द्यायची नसल्याने एसीबीकडे तक्रार
केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची शहनिशा करता आज दुपारी सापळा रचला.डॉ.मोरे आणि डॉ.वाडेकर हे दोघे प्रत्येकी १ हजार रुपयांची लाच घेत असताना एसीबीच्या जाळ्यात ते अडकले. दोघांना एसीबीने ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक विभागाचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासने,
अपर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे, सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ,पोलिस उपअधिक्षक सुनिल कुराडे,पीआय झोडगे,राजन कदम, शरद काटके, जयंत साळवे, संतोष पावरा,प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडीले, भूषण खलाणेकर, भूषण शेटे,महेश मोरे, कैलास
जोहरे, पुरुषोत्तम सोनवणे,गायत्री पाटील, संदीप
कदम,सुधिर मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments