Header Ads Widget

साक्री रोडवरील सप्तश्रृंगी मंदीराजवळील धोकेदायक खड्डा महापालिका अधिकार्‍यांची भूमिका ‘चिलम तमाकु,ओ घरकू’



धुळे-शहरातील साक्री रोडवरील मलेरिया ऑफीसमागील सप्तश्रृंगी मंदिरालगत स्वामीनारायण मंदिर रोडवर पालिकेचा व्हॉल्व लिक झाल्यामुळे सुमारे महिनाभरापासून खोदून ठेवलेला अंदाजे पाच फुटी खड्डा धोकादायक बनला असून हा खड्डा आणि त्या खडड्यातील सतत वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहामुळे खड्ड्यालगतच्या परिसरात साचलेले पाणी, त्यामुळे वाढलेली झाडे-झुडपी आणि डासांचा प्रादुर्भाव यामुळे नेमकी जबाबदारी कुणाची? पाणीपुरवठा की आरोग्य विभाग? संबंधित असुविधांबद्दल वेळोवेळी पालिकेचे अधिकारी यांना सांगूनही वृत्तपत्र व समाजमाध्यमातून वृत्त प्रसिद्ध होऊनही दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांची भूमिका म्हणजे ‘चिलम तमाकु, वो घरकू’ म्हणजे तक्रार करावी तरी कुणाकडे असा संभ्रम परिसरातील नागरीकांना पडला आहे.
आज सकाळीच ‘मॉर्निंग वॉक’ला जाणार्‍या काही नागरीकांनी या पाच फुटी खड्ड्यातून एका कुत्र्याच्या पिलूला जिवंत बाहेर काढले असे समजले. ते कुत्रे त्या खड्ड्यात पडले होते की पोहत होते?  ते समजायला मार्ग नाही. पण समजा पाण्याने भरलेल्या या पाच फुटी खड्ड्यात एखादे लहान बालक खेळतांना पाय घसरुन पडले व त्यावेळी तेथे कोणी मोठी व्यक्ती नसेल तर काय होईल? हा जर-तर चा प्रसंग देखील अंगावर शहारे आणणारा आहे. लगतच परिसरातील मोबाईल कंपन्यांचे नुकत्याच गाडलेल्या खांबाभोवतीचे मोठे मातीचे ढीग म्हणजे ‘आम्ही या गावचे नाहीच’ असे त्यांना सांगायचे असेल. या खड्ड्यांमधून रोजच धो-धो वाहणारे वाया जाणारे पाणी, पाण्यामुळे साचलेले डबके, झाडी झुडपी आणि त्यामुळे डासांचे रोगराईला निमंत्रण याची कुणीतरी नैतिक जबाबदारी स्विकाराहो! पालिकेच्या कर्त्याधर्त्यांनो ! जनतेचा सहनशीलतेचा उच्चांक आहेच, पण तुमच्या कडून काळजीच्या निच्चांकाची अपेक्षा नाही अशी विनंती राष्ट्र सेवादलाचे ज्येष्ठ साथी गो. पि. लांडगे यांनी पालिकेच्या अधिकार्‍यांना केली आहे.

*******

Post a Comment

0 Comments