Header Ads Widget

⭕रमाई आवास योजनेंतर्गत विभागात ३६ हजार कुटुंबांना घरे, ⭕ २५हजारहून अधिक घरकुलांची कामे प्रगतीपथावर.......




 नाशिक : सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजनेत विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या ३६ हजार २०८ कुटुंबांचे स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. 
तसेच २५ हजार २८ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
 रमाई आवास योजनेत नाशिक जिल्ह्यात
 (शहर, ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात) 
५००८ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. 
तर ९३७४ घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. 
धुळे जिल्ह्यात ४३१७ घरकुले पूर्ण झाली.
 तर ३३०१ घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहे.
 नंदुरबार जिल्ह्यात ३१९३ घरकुले पूर्ण तर ७७० प्रगतीपथावर, 
जळगांव जिल्ह्यात १३२६४ पूर्ण तर ६७१८ घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहेत. 
अहमदनगर जिल्ह्यात १०४२६ घरकुल पूर्ण झाली असून सध्या ४८६५ घरांचे कामे प्रगतीपथावर आहे. 
राज्य सरकारने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील कुटूंबांसाठी २००९ यावर्षी रमाई आवास योजना सुरू केली आहे. 
त्या अंतर्गत ग्रामीण, शहरी भागांत स्वत: च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या जागेवर २६९ चौरस फुटाचे पक्के घर बांधण्यात येते. 
ज्या लाभार्थ्यांचे नाव सामाजिक-आर्थिक जात सर्वेक्षण २०११ यादीमध्ये नाही. 
परंतु, ज्या लाभार्थ्यांना घराची आवश्यकता आहे. 
अशा लाभार्थ्यांची नावे 
‘प्रपत्र —ड’ मध्ये असतील तर त्यांची निवड केली जाते. 
कच्चे घर असणाऱ्या कुटुंबांना नवीन पक्के घर बांधकामासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते.
 घर बांधकामासाठी ग्रामीण भागासाठी एक लाख ३२ हजार रूपये आणि नक्षलग्रस्त डोंगराळ क्षेत्रासाठी एक लाख ४२ हजार रूपये, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका आणि मुंबई विकास प्राधिकरण क्षेत्रासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते.

Post a Comment

0 Comments