Header Ads Widget

मालपूर रामनगर भिल्ल वसाहत येथील मराठी शाळेच्या प्रागंणात वृक्षारोपण करतांना आमदार मंजूळाताई गावीत,शाळेचे शिक्षक व निसर्ग मित्र समितीचे पदाधिकारी आदि.




कासारे----ऑक्सिजन तुटवड्याचे  चटके सोसत  कोविड काळात साक्री तालुका निसर्ग मित्र समितीने या उजाड डोंगराच्या माळरानावर हिरवाई निर्माण करण्याचे हाती घेतलेले काम अतिशय कौतुकास्पद व प्रेरणादायी असून या कामी शासन स्तरावर जी काय मदत लागेल ती आवश्य केली जाईल अशी ग्वाही देत समिती सदस्यांच्या कामाचे  आमदार मंजूळाताई गावीत यांनी कौतूक केले .
    गेल्या रविवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून मालपूर रामनगर भिल्ल वसाहती नजीकच्या डोंगरावर ,साक्री तालुका व कासारे- मालपूर च्या निसर्ग मित्र समिती ने आयोजित केलेल्या अण्णा भाऊ साठे स्मृतीदिन,  वृक्ष लागवड व निसर्ग प्रेमींच्या मेळाव्यात प्रसंगी साक्री च्या आमदार सौ.मंजूळाताई  गावीत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष डी.बी.पाटील हे होते तर,प्रमूख पाहूणे म्हणून निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, जि.प.सदस्य गोकुळसिंह परदेशी,साक्री तालुका शिवसेनाप्रमुख पंकज मराठे, कासा-याचे प्रथम लोकनियुक्त व धुळे जिल्हा सरपंच संघटनाध्यक्ष विशाल देसले ,मालपूर च्या सरपंच घमाबाई भिल,उपसरपंच भारतीताई भामरे,मालपूर ग्रामपंचायतीचे गट नेते नयनेश भामरे,साक्रीच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.राजेंद्र अहिरे व डाॅ.पी.एस्. सोनवणे,पिंपळनेरचे प्राचार्य डाॅ. एस्. टी.सोनवणे,,दहीवेलचे प्राचार्य डाॅ. एस्. सी.अहिरे,.निसर्ग मित्र समिती चे जिल्हा उपाध्यक्ष विलास देसले ,तालुकाध्यक्ष राकेश जाधव,उपाध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरें,कार्याध्यक्ष सुरेश   पारख, निसर्ग मित्र समिती च्या पदाधिकारी व निसर्ग प्रेमींमधे ,प्रा.अजय नांद्रें,मिलिंद नांद्रें,सुहास सोनवणे,ॠषिकेश सोनवणे,दिपक  कुवर आणि पत्रकार  विद्यानंद पाटील , मुख्याध्यापक शामराव आहिरराव, शिक्षिका सुनंदा पाटील, सुभाष मोहिते पाटील, पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या तालुका अध्यक्ष वंदना खैरनार ,विलासराव सोनवणे,अशोक सोनवणे,महेश बोरसे, गजेंद्र  भामरे ,मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक नांद्रें,आदि मान्यवर उपस्थित होते. 
       आपल्या मार्गदर्शनातून आमदार गावीत पुढे म्हणाल्या की,वृक्ष लागवड व संवर्ध ही काळाची गरज असून हे राष्ट्रीय काम साक्री तालुका निसर्ग मित्र समिती करते आहे, ही खूप प्रेरणादायी बाब असून आपल्या कार्यास आमचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने हवी ती मदत  आपण करू व तालुक्याच्या विकासात्मक अनेक कामांचे आपण प्रस्ताव पाठविले असून त्यास त्यांनी हिरवा कंदील दिला असल्याचे त्यांनी नमूद करत उपस्थित आदिवासी रामनगर वासियांना कोविड ची लस -मात्रा घेण्याचे आवाहन केले. 
        या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना डी.बी.पाटील व निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांनी साक्री तालुका निसर्ग मित्र समितीच्या वृक्ष लागवड अभियानास दिलेल्या प्रतिसादा बद्दल समिती पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले व धन्यवाद दिलेत.त्यांनी निसर्ग मित्र समिती च्या वतीने आमदार गावितांचा कोविड योद्धा म्हणून गौरवही केला.
     या प्रसंगी कार्याध्यक्ष सुरेश पारख व प्रा. अजय नांद्रें यांनी रामनगर ही आदिवासी वसाहत आम्ही दत्तक घेत असून येथल्या प्रत्येक कुटुंबाला मोफत गॅस व विज  उपलब्ध करून देणे ,शुद्ध पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा , विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा ,मोफत  पिठ गिरणी . आदि सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची,व हे स्थळ भावी पर्यटन स्थळ म्हणून उदयास आणू असा मनोदय व्यक्त केला. तसेच याकामी मालपूरच्याच डोंबिवली स्थीत उद्योगपती रामराव सोनू नांद्रें ( सितसन इंडिया कं ) यांच्या भरीव अर्थसाह्यातून हे काम उभे रहात असल्याचे सांगून त्यांचे जाहिर आभार व्यक्त केले व अजून अशा निसर्ग प्रेमींनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.  
       अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रारंभीच अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे  व वृक्षांचे पूजन करून सुरूवात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्राचार्य बी.एम्. भामरे यांनी केले व  सुरेश पारख यांनी सर्वांना वृक्ष प्रतिज्ञा दिली तर सुत्रसंचालन विलास देसलेंनी व आभार प्रदर्शनस प्रा. प्रदिप सावळे यांनी केले. सर्वांना भोजनाची सुविधा केलेली होती.

Post a Comment

0 Comments