अमळनेर- येथील के.डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक एस.सी.तेले यांना शिक्षक भारती व सहयोगी संघटनांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षक भारती, राष्ट्र सेवादल, लोकसंघर्ष मोर्चा व छात्रभारती या संघटनांतर्फे दि. 25 ऑगस्ट रोजी गुणवंत शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. जळगाव येथील कांताई सभागृहात शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते एस.सी.तेले यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. या कार्यक्रमाला संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, राजेंद्र दिघे, विजय सोनवणे, अशोक पवार, युवराज पाटील, दिलीप आर्डे, चंद्रकांत देशमुख, भरत शेलार, आप्पासाहेब पाटील, रणधीर इंगळे, के. के. पाटील, माध्य.जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, प्राथ.जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील, आर.जे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिक्षक आमदार सुधीरजी तांबे, संस्थेचे अध्यक्ष अविनाश संदानशिव, प्रा.अशोक पवार, बन्सीलाल भागवत, चेतन राजपूत, आर.जे.पाटील, के.डी.गायकवाड माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदराव नेतकर सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच समाज बांधवांनी एस.सी.तेले यांचे अभिनंदन व सत्कार केला.
*******

0 Comments