Header Ads Widget

१५०० रु लाच मागितल्या प्रकरणी महिला सरपंच, नवरा आणि भासऱ्याला अटक



– धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी मागितली होती लाच
धामणगाव रेल्वे ( प्रतिनिधी) कंत्राटदाराला धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी १५०० रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने  तालुक्यातील जळका पटाचे येथील महिला सरपंच, तिचा नवरा आणि भासऱ्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
                एसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार जळका ( पटाचे) येथील तार कंपाउंड ( चेन लिंक बांधकाम, नालीचे बांधकाम आणि हौदाचे (टाका) बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचे ग्राम पंचायत कडून २२,७००/- रुपयांचे बिल घेणे होते. त्यासाठी त्याने ग्रा. पं. कडे बिलाच्या रकमेची मागणी केली. सचिव आडे यांनी या कामाच्या मजुरीचा सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा धनादेश बनवून त्यावर स्वतःची स्वाक्षरी करून दिली. पण सचिवा सोबत सरपंचाची स्वाक्षरी आवश्यक असल्याने तक्रारदार मजूर कंत्राटदार याने दि. १७ ऑगस्ट २०२१ रोजी सरपंच यांना भ्रमणध्वनीवर धनादेशावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली.
                 तेव्हा येथील सरपंच सोनाली संजय पिल्हारे यांनी त्यांना धनादेश देण्यासाठी १५०० रुपायांची मागणी केली. सोनाली (सरपंच) यांचे पती संजय पिल्हारे आणि भासरे विजय पिल्हारे यांनी सचिवांच्या सहीचा धनादेश स्वतःकडे ठेऊन घेत त्यावर सरपंच सोनाली यांची सही घेण्यासाठी १५०० रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार याला लाच द्यायची नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार केली। दि. १८ आणि १९ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता तक्रारीत सत्यता आढळून आल्याने या तिघांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
            सदरची कारवाई विशाल गायकवाड पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र अमरावती, अरुण सावंत अप्पर पो. आधी. एसीबी अमरावती परिक्षेत्र अमरावती, संतोष इंगळे, पो. नी. एसीबी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नी. अमोल कडू, म.पो.ह. माधुरी साबळे, ना. पो. कॉ. विनोद कुंजाम, पो.कॉ. शैलेश कडू, निलेश महिंगे, सहा.पो.उप.नी. सतीश किटूकले आणि चालक प्रदीप बारबुद्धे यांनी पार पाडली

Post a Comment

0 Comments