नरडाणा 4 ऑगस्ट
पुतणीकडून विकत घेतलेल्या काकडीचे पैसे का दिले नाही, असा जाब विचारल्याने इसमाला तिघांनी मिळून बेदम मारहाण करीत त्याचा खून केल्याची भीषण घटना वर्षी ता.शिंदखेडा येथे घडली. संजय निंबा कोळी रा.कोळी गल्ली, वर्षी ता.शिंदखेडा असे मयताचे नाव आहे.
याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात युवराज लक्ष्मण मंडाले (कोळी) रा.कोळी गल्ली, वर्षी ता.शिंदखेडा याने फिर्याद दिली. त्यानुसार, काल ३ रोजी सायंकाळी ६ ते सव्वा सहाच्या सुमारास वर्षी गावातील खालची भिलाटी वस्तीत युवराज कोळीची पुतणी कु.लिना हिने काकडी विकत होती. तिच्याकडून खालची भिलाटीत राहणार्या प्रकाश भिमराव पांचाळ (सोनवणे), विशाल साहेबराव पांचाळ, मुकेश शाम पांचाळ यांनी काकडी घेतली मात्र त्याचे पैसे दिले नाहीत.
दरम्यान, याप्रकरणी नरडाणा पोलिसांनी प्रकाश भिमराव पांचाळ रा.खालची भिलाटी, वर्षी याला मध्यरात्री अटक केली आहे. तसेच तिघांच्या विरुध्द भादवि कलम ३०२ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

0 Comments