दोंडाईचा
*रोटरी नागरी सहकारी पतसंस्थेस राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार प्रदान*
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.मुबंई पुरस्कृत आयोजित राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार २०२० स्पर्धेत *रोटरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.दोंडाईचा* यास नाशिक विभाग (नाशिक, धुळे, नंदुरबार.जळगांव, अहमदनगर ) पुरस्काराने गौरविण्यात आले.सदर पुरस्कार सोहळा *सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिर शिर्डी* येथेमहाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच चे अध्यक्ष*मा.श्री.काकासाहेब कोयटे* ,यांच्या हस्ते संपन्न झाला.
पुरस्कार स्विकारते वेळी पतसंस्थेचे विदयामान चेअरमन सुरेशभाऊ जैन, संचालक श्री संजयजी छाजेड ,श्री रमेशजी जैन, श्री ईश्वरलालजी भावसार, श्री प्रदीपजी जैन पतसंस्थेचे मॅनेजर श्री नारायण शर्मा.उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि.मुंबई आयोजित स्पर्धेत *सलग दोन वर्षांपासून*राज्यस्तरीय पुरस्कार मिळवण्याचा बहुमान रोटरी पंत संस्थेला मिळत आहे. पत संस्थेचे विदयामान चेअरमन श्री. सुरेशभाऊ जैन यांची दुरदृष्टी व त्यांचा नेतृत्वने चललेला पारदर्शक कारभार तसेच संस्थेचे संचालक व संस्थेचे सभासद ठेवेदार व कर्मचारी वर्ग यांचे वेळोवेळी मिळालेले सहकार्या मुळेच पत संस्थेने गरुडझेप घेतली आहे. व पतसंस्थेला हा दुसऱ्यांदा हा बहुमान मिळाला आहे. असे संस्थेचे विदयामान चेअरमन सुरेशभाऊ जैन यांनी साप्ता.दोंडाईचा समाचार शि बोलताना म्हणालेत.

0 Comments