Header Ads Widget

नरडाणा येथे *बचत गटांना बँक कर्ज मेळावा संपन्न*


                                                      नरडाणा :- येथे बचत गटाच्या विविध गटांना स्टेट बँक ऑफ इंडिया व युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने कर्ज वितरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंप्राड येथील सरपंच सौ. वैशाली बोरसे, तर प्रमुख अतिथी म्हणून प. स. सदस्य बलवंत बोरसे, पिंप्राड येथील उपसरपंच प्रफुल्ल बोरसे, तालुका अभियान व्यवस्थापक राजेंद्र पाटील, रवींद्र गांगुर्डे, महेंद्र ठाकरे, स्टेट बँकेचे सुरज गीते, युनियन बँकेचे प्रशांत कांगुणे, पत्रकार भालचंद्र पाटील, पत्रकार सतीश चोरडिया आदीं उपस्थित होते.                       
                                                                   यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पत्रकार सतीश चोरडिया यांनी कोरोणा महामारी च्या काळात बचत गटांनी केलेल्या  कामगिरीचा


 उल्लेख केला. बचत गटांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी महिला


 बचतगटांशी साधलेल्या संवादाचा देखील उल्लेख श्री चोरडिया यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला. यावेळी तालुका व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या भाषणात बचत गटाच्या विविध योजनांचा उल्लेख केला. बचत गटांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी दोन्ही बँकांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर महेंद्र ठाकरे व बचत गटाच्या सीआरपी अनिता बोरसे, मनोरमा वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक भावना तमखाने यांनी केले. यावेळी छत्रभुज पाटील, विठ्ठल पेंडलवाड़, रंजना पाटील, सिमा बोरसे, मंगला सपकाळे, रागिणी माळी, मंगला कदम, निलिमा माळी, संगिता चौधरी, सपना बोरसे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments