Header Ads Widget

*अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेतील हेड कॉन्स्टेबलची बदली; वर्षाला घेत होता दीड कोटी पगार* पोलीस कर्मचाऱ्याला सरकारी पगार मिळत असताना अशा पद्धतीने पैसे घेण्याची परवानगी नाही.




मुंबई---बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर छोट्या पडद्यावर देखील त्यांनी स्वत:ची छाप सोडली आहे. त्यामुळे अमिताभ जिथे जातील तिथे त्यांची झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. या कारणामुळे त्यांना सुरक्षिततेची गरज आहे. अमिताभ यांचे अंगरक्षक म्हणून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसातील हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांची आहे. काल सर्वत्र त्यांच्या वार्षिक पगाराची चर्चा सुरु होती. जितेंद्र यांचा वार्षिक पगार हा दीड कोटी रुपये असल्याचे समोर आल्यानंतर गुरुवारी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जितेंद्र यांची बदली ही डीबी मार्ग पोलिस ठाण्यात केली.

यानंतर आता राज्य सरकार तपासणी करत आहे की जितेंद्र यांनी त्यांच्या वार्षिक उत्पन्नाबद्दल आणि त्यांच्या मालमत्तेबद्दल पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली होती का? आणि ते दुसऱ्या व्यक्तीकडून पगार घेत होते का?, कारण हे राज्य सेवा नियमांनुसार प्रतिबंधित आहे.

दरम्यान, एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला नुकतीच मुलाखत दिली आणि जितेंद्र यांची बदली झाल्याचे सांगितले. 'हेमंत नगराळे यांनी ठरवलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार पद्धतीत बदल आहेत. कोणताही पोलिस कॉन्स्टेबल एका ठिकाणी ५ वर्षे राहू शकत नाही. त्यामुळे जितेंद्र यांनी बदल करण्यात आली आहे,' असे ते म्हणाले.

जितेंद्र यांच्या वार्षिक पगारा व्यतिरिक्त त्यांची पत्नी देखील खूप मोठा व्यवसाय करतात. त्या सेलिब्रिटींना त्यांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड देण्याचे काम करतात. यावर ते अधिकारी पुढे म्हणाले, 'सध्या आमच्याकडे अशी कोणती माहिती नाही. मीडियामध्ये आलेल्या वृत्ताला पाहता सगळ्यात आधी जितेंद्र यांना नोटीस देऊ आणि त्यांच्याकडून याविषयी माहिती घेऊ. राज्य सरकार त्यांना नियमितपणे पगार देत असूनही, ते दुसऱ्या एजन्सीकडून वेगळा महिन्याचा पगार घेत आहेत की नाही या विषयी आम्ही जाणून घेऊ. पोलीस कर्मचाऱ्याला सरकारी पगार मिळत असताना अशा पद्धतीने पैसे घेण्याची परवानगी नाही.'

Post a Comment

0 Comments