शिंदखेडा ( प्रतिनिधी ) धुळे जिल्ह्य़ातील शिंदखेडा तालुक्यात नगरपंचायत शहरातील अनेक वार्डनिहाय कामात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्ष म्हणजे खुद्द काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.त्याविरोधात प्रत्येक वार्डनिहाय समस्या
मोहीम हाती घेतली असून भ्रष्टाचार कसा केला आहे.हे उघडकीस येत आहे.त्यासाठी शहरातील नागरिकांनी देखील दबक्या आवाजात का होईना पण सत्ताधारी नगरपंचायत च्या विरोधात बोलु लागले आहेत.वारंवार निवेदन आणि तोंडी तक्रार केल्यानंतर ही दखल न घेतलेल्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी वर कारवाई केली जावी अन्यथा जिल्हाधिकारी यांच्या समोर पाढा वाचुन शहरातील रहिवासी व काँग्रेस चे गटनेते यासह सर्व नगरसेवक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला. *शिंदखेडा शहरातील वार्ड क्र.११ ची समस्या*- शिंदखेडा शहर हे नेहमीच राजकीय वादात असल्याने शहरात चाललेल्या गैर कारभाराविषयी काँग्रेस चे प्र नगराध्यक्ष तथा गटनेते दिपक दादा देसले यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक तथा प्रतोक दिपक अहिरे, नगरसेवक उदय देसले ,संगीता किरण थोरात ,संगीता चंद्रकांत सोनवणे, स्विकृत नगरसेवक सुमित जैन यांनी जिथे समस्या तिथे काँग्रेस वार्डनिहाय मोहीम सुरू केली आहे.आजपासुन सुरू झालेल्या *वार्ड क्र.11* च्या खुद्द सत्ताधारी भाजपचे गटनेते अनिल वानखेडे यांच्या वार्डात पिरबाबा पासून भुमिगत गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून उलट घरात गटारीचे सांडपाणी येत आहे.बर्याच ठिकाणी गटार उघड्यावर दिसुन येत आहेत.गटारी तुंबलेल्या आहेत.म्हणुन आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.आधीच कोरोणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.त्यात डेंगु च्या साथीनं थैमान घातले आहे.वेळीच उपाय योजना झाली नाही तर मोठा अनर्थ घडु शकतो.हयास जबाबदार नगराध्यक्षा व मुख्याधिकारी नगरपंचायत राहील.येवढेच नाहीतर ओपन जागेची समस्या अजुन जैसेथे आहे.गेल्या तीन वर्षापासून कच्चा रस्त्यावर गाडी चालणे तसेच पायी चालणे जिकरीचे होते.म्हणुन स्व खर्च वर्गणी गोळा करून मुरुम टाकत आहेत.वारंवार नगरपंचायत ला रहिवासी यांनी तक्रार केली तर दुर्लक्ष होत असेल तर काय उपयोग मात्र घरपट्टी , पानपट्टी इतर कर न चुकता वसूल करण्यात येत आहेत अशा संतप्त प्रतिकिया रहिवासी संजय पाटील यांच्यासह नागरिकांनी व्यक्त केल्या.संबधित वार्डातील प्रश्न न सोडविण्यास जिल्हाधिकारी कडे पाढा वाचून निदर्शनास आणून काॅग्रेस व शहरवासियांतर्फ पुढील काळात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे काँग्रेस चे गटनेते दिपक देसले यांच्यासह नगरसेवकानी केली आहे.


0 Comments