* शिंदखेडा ( प्रतिनिधी ) धुळे जिल्ह्य़ातील शिंदखेडा तालुक्यात शनगरपंचायत शहरातील अनेक वार्डनिहाय कामात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्ष म्हणजे खुद्द काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात शयेत आहे
*शिंदखेडा शहरातील वार्डनिहाय समस्या*- शहरात चाललेल्या गैर कारभाराविषयी काँग्रेस चे प्र नगराध्यक्ष तथा गटनेते दिपक दादा देसले यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक तथा प्रतोक दिपक अहिरे, नगरसेवक उदय देसले ,संगीता शकिरण थोरात ,संगीता चंद्रकांत सोनवणे, स्विकृत नगरसेवक सुमित जैन यांनी जिथे समस्या तिथे काँग्रेस वार्डनिहाय मोहीम सुरू केली आहे. सुरू झालेल्या *वार्ड क्र. 2 -3* मधून सिद्धार्थ नगर येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित सुधार योजना अतर्गत सन -2016 -17 मध्ये सिद्धार्थ नगर महिला व पुरुषांना सार्वजनिक शौचालय बांधकामास सुमारे 26,50,000 रु.ची प्रशासकीय मान्यता 10-05-2018 ला मिळाली काम पुर्ण झाले परन्तु रहिवासींना अद्याप लाभ नाही.आजही दुरावस्थेत पडलेले शौचालय आहे.अत्यत खराब अवस्थेत असुन त्याचा दुरुपयोग करीत आहेत. ह्यावर चौकशी होऊन कायदेशीर अनुसूचित जनजाती प्रमाणे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी तसेच ठेकेदार सेवा फाउंडेशन पुणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रहिवासी दिनेश मोरे व राजेंद्र थोरात यांनी केली आहे..संबधित वार्डातील प्रश्न न सोडविण्यास जिल्हाधिकारी कडे पाढा वाचून निदर्शनास आणून मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार विरोधी काॅग्रेस व शहरवासियांतर्फ पुढील काळात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे काँग्रेस चे गटनेते दिपक देसले यांच्यासह नगरसेवकानी केली आहे.


0 Comments