*ठाणे महापालीकेच्या सहाय्यक आयुक्त व अंगरक्षक यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ दोंडाईचा नगरपालीकेतर्फ काम बंद आदोंलन करत तहसीलदारांना दिले निवेदन...*
*निवेदनात आरोपीला कडक शासन होवून, अधिकाऱ्यांच्या चक्राकार बदल्या धोरण जैसे थे ठेवण्याची संघटनेची मागणी...*
*जनमत-*
*दोंडाईचा-* येथे आज दुपारी बारा वाजता दोंडाईचा वरवाडे नगरपालीकेच्या कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघनेकडून ठाणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त व त्यांचे अंगरक्षक यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आरोपीला कडक शासन व्हावे व अधिकाऱ्यासांठीचे बदली बाबत चक्राकार धोरण जैसे थे ठेवण्याची मागणी करत सर्व कर्मचाऱ्यांनी नगरपालीका ते तहसील कचेरीपर्यंत पायी चालत तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
यावेळी अप्पर तहसीलदार श्री सुदाम महाजन यांना दिलेले निवेदनाचा आशय असा की, दिनांक ३० आँगस्ट २०२१ सोमवार रोजी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पना पिंपळे भाजीपाला प्रभाग दोन सांयकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत व बेकायदेशीर सार्वजनिक जागेवर लावलेल्या हातगाडी धारकांवर कारवाई करत असताना,तेथील गुन्हेगार वुत्ती असलेला हातगाडी धारक श्री अमरजीत यादव याने त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक श्री सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करून, ह्या हल्ल्यात दोघांना गंभीर दुखापत केली. ह्या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पना पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन्ही बोटे तुटून पुर्णपणे रस्त्यावर पडली व उजव्या हाताची अंगठ्या सह गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या डोक्यावर खोल मार लागला आहे. अंगरक्षक श्री सोमनाथ पालवे यांच्या डाव्या हाताचे एक बोट पुर्णपणे तुटून पडले. या दोघांना प्रथम वेदांत रूग्णालय ठाणे येथे नेण्यात आले. मात्र गंभीर दुखापत व जीवाला असलेला धोका लक्षात घेता दोघानाही तात्काळ ज्युपिटर हाँस्पीटलमध्ये हलविण्यात आले. यावेळी श्रीमती कल्पना पिंपळे वर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये त्यांची दोघी तुटलेली बोटे जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर अंगरक्षक श्री सोमनाथ पालवे यांचे तुटलेले बोट रात्री उशिरापर्यंत मिळून न आल्याने त्यांच्या तुटलेल्या बोटावर आहे त्या परिस्थितीत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे झालेल्या प्रकार गंभीर असुन निषेधार्थ आहे.
एक महिला अधिकाऱ्यावर अशाप्रकारे हल्ला होणे ही नक्कीच चिंतेची बाब असुन सर्व स्तरातुन निषेध होणे आवश्यक आहे. शासनाचे कनिष्ठ अधिकाऱ्यासाठीचे बदल्याचे चक्राकार धोरण ,पती-पत्नी एकत्रीकरणाला नवीन धोरणात दिलेला फाटा व अशाप्रकारे होणारे जीवघेणे हल्ले. ह्यामुळे आम्हीच नाही तर महिला अधिकाऱ्याच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल याचा सुद्धा गंभीर विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही मान्यता प्राप्त संघटना दोंडाईचा वरवाडे नगरपालीका कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेकडून ह्या गुन्हेगारी प्रवुत्तीचा जाहीर निषेध करत आहे.
भविष्यात गुन्हेगार प्रवुत्तीचे लोक जेव्हा प्रामाणिक कर्तव्य बजावत असणाऱ्या अधिकाऱ्यावर हल्ले करतात. तेव्हा अशाप्रकारेच्या भ्याकड हल्ल्याने अधिकारीचे मनोधैर्य नाही तर संपुर्ण प्रशासनात प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होते.त्यामुळे अशा गुन्हेगार प्रवत्तीवर वेळीच कडक शासन कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी संघटनेकडून राज्य उपाध्यक्ष श्री शिवनंदन राजपूत, स्थानिक अध्यक्ष श्री विवेक ब्राम्हणकर, उपाध्यक्ष श्री लखन कंड्रे, जगदीश पाटील, दिवलेव बागुल, प्रकाश जावरे, शरद महाजन, सुधीर माळी, श्रीपाद नाईक, हर्षल ढवळे,राहुल जाधव आदींनी निवेदनावर सह्या करत केली आहेत.

0 Comments