म. दि. सिसोदे कला, वाणिज्य महाविद्यालय नरडाणा येथे दि.12/8/21 रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी व्याख्याते डॉ यू. जी पाटील होते. युवावर्ग अतिसंवेदनशील असावा, युवा पिढीत नवचैतन्य निर्माण व्हावे, समोर असलेली आव्हाने पेलता यावी. ज्ञाननिर्मिती व्हावी, स्वबळावर अस्तित्व निर्माण करावे, युवा पिढी समोर असलेल्या समस्या त्याचे समाधान असे विविध पैलूवर प्रमुख वक्ते यांनी मार्गदर्शन केले.महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद यावेळी उपस्थित होते. एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. जी. सोनवणे, सहाय्य्क कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. एस. धिवरे यांनी यशस्वी नियोजन केले.

0 Comments