धुळे- धुळे शहरात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने पदाधिकारी व सहकारींना यापुढे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना पुष्पगुच्छ सोबत जंग न लागणारी झाडांची संरक्षण जाळी व ऑक्सिजन देणारे एक रोप देवून वाढदिवस साजरा केला जाणार असून यासाठी लागणाऱ्या संरक्षक जाळ्या जेष्ठ मार्गदर्शक किशोर आप्पा थोरात व सेवा आघाडीचे उपाध्यक्ष विजय धनजी चौधरी यांनी दिल्या असून या कार्यक्रमाचा शुभारंभ सेवा आघाडीचे राज्य अध्यक्ष सुभाष पन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी म्हणाले की, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश अध्यक्ष खा. रामदासजी तडस, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, प्रदेश महासचिव डॉ. भूषण कर्डिले, युवा आघाडी राज्य अध्यक्ष आ. संदीप क्षिरसागर यांच्या मार्गदर्शन खाली राज्यात तेली समाजाचे मोठे संघटन झाले असून तेली समाजाला दिशा मिळाली आहे. तर सदरचा उपक्रम राबविण्यामागील कारण म्हणजे जगभरासह भारतात सध्या कोविड-19 चा कहर सुरू आहे. ऑक्सिजन कमतरता अनेक रूग्णांच्या मृत्यूचे कारण बनत आहे. पृथ्वीवर ऑक्सिजनचा चांगला आणि एकमेव स्त्रोत म्हणजे झाडे मानली जातात.ऑक्सिजन देणारे झाडे लावली पाहिजे ती जगविली पाहिजे यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी स्थायी समिती सभापती व तैलिक महासभेचे जिल्हा अध्यक्ष कैलास काळू चौधरी, विभागीय पदाधिकारी शशिकांत चौधरी, अनिल अहिरराव,युवा आघाडी विभागीय उपाध्यक्ष तुषार चौधरी, जेष्ठ नेते बबनराव चौधरी, वैद्यकीय आघाडी राज्य उपाध्यक्ष डॉ. भूषण चौधरी, वि.अध्यक्ष संजय चौधरी, जि.उपाध्यक्ष गिरीश चौधरी, सेवा आघाडी वि.अध्यक्ष डी. डी.महाले, जिल्हा अध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष रमेश करनकाळ,पवार गुरुजी, मोहन चौधरी, पोपट चौधरी, रामभाऊ चौधरी, भानुदास चौधरी,हिरु आप्पा चौधरी, समन्वयक महेश चौधरी, युवा शहराध्यक्ष गणेश चौधरी,युवा जळगाव जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, किरण बागुल, जयवंत चौधरी, विलास चौधरी, विनोद चौधरी, किसन थोरात, रणवीर चौधरी, कल्पेश चौधरी, चंद्रकांत चौधरी, बापू तुकाराम चौधरी, संतोष चौधरी,विजय नेरकर सर, उत्तम चौधरी, संजय चौधरी, रमेश चौधरी, सुनिल चौधरी, पंकज चौधरी,किशोर चौधरी,कुणाल चौधरी,प्रकाश चौधरी, शांताराम चौधरी, उत्तम चौधरी,दिनेश चौधरी, सुमित चौधरी,सुरेश चौधरी,संदीप चौधरी, बंटी चौधरी, पंकज चौधरी यांच्या सह महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सर्व आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन पोपट चौधरी तर तुषार चौधरी यांनी आभार मानले.

0 Comments