*एक लाख ऐंशी हजार रोख व साडे सात तोळे सोने चोरीला...*
*गजबजलेल्या वस्तीतील शिवाजी नगर येथील घटना...*
*मुळ घरमालक धुळे दवाखान्यात, मात्र शेजारीन बाई शहनाज खाटीकमुळे चोरीची घटना कळाली...*
*जनमत-*
*दोंडाईचा-* सध्या शहरात व शहरातील गल्ली बोळात चोरांनी धुमाकूळ घातला असुन, दिवस उजळो न उजळो कुठे ना कुठे चोरींच्या घटनांना चोरांकडून लक्ष केले जात आहे. आज सकाळीही गजबजलेल्या शिवाजी चोकात घरमालक लहान मुलाच्या दवाखान्यानिमित्त धुळे येथे गेलेले असताना चोरट्यांनी एक लाख ऐंशीहजार रोख व साडे सात तोळे सोने असा सहा लाखाच्या आतील जबरी चोरीच्या घटनेला लक्ष केले आहे. याबाबत शेजारीनबाई शहनाज खाटीक यांना घराचे दार उघडे दिसल्या कारणाने त्यांनी घरमालक दवाखान्यातून परत आले का,याचा तपास करायला आत गेले असता. त्यांना घरातील कपाट व इतर साहित्य अस्तव्यस्त दिसले. यावेळी त्यांनी लागलीच. घरमालक भुषण लोटन खारकर यांना चोरी झाल्याची माहिती दिली.
याबाबत घरमालक भुषण खारकर यांनी आपला मित्र जितेंद्र जामराव काळे याला भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती देत.आपल्या घरी पाठवले व पोलीसांना माहिती देण्यास सांगितले. तसेच स्वतः ही लागलीच दोंडाईचासाठी रवाना झाले. सकाळी नऊ वाजता घटनास्थळी दोंडाईचा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक श्री संतोष तुकाराम लोले यांनी वरिष्ठांना माहिती देत. कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली.
त्यानंतर दुपारी एक वाजता धुळ्याचे डॉग स्क्वाँड पथक घटनास्थळी पोहचले. त्यात जँकी नावाच्या श्वानाला पाचारण करण्यात आले होते.जँकीने घराचा सुगावा घेत. गल्लीतील उजव्या व डाव्या साईडला फेरफटका मारला. यावेळी सोबत फिंगर प्रिंट एक्सपर्ट सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र राजपुत, पोलीस नाईक हिरालाल हरणे,धंनजय मोरे,मनोज ब्राम्हणे, के.एस.परदेशी, जी.बी.मंगळे, चालक जे.ऐ.पिंजारी आदी उपस्थित होते. याबाबत घरमालक भुषण लोटन खारकर यांनी दोंडाईचा पोलीस स्टेशनला चोरी झाल्याची तक्रार दिली असुन, उशिरापर्यंत दाखल करण्याचे काम सुरू होते.
सध्या दोंडाईच्यात नागरिकांना रोज उठून होणाऱ्या चोरीच्या घटना, काय झोप लागू देत नाही आहे. दिवस उजळला की,कुठे चोरी होईल व चोर कुठे हात मारतील तसेच कोणाचा खिसा कापतील याचीच भिती त्यांना लागलेली असते. पुर्वी चोर चोरी करायला एकांतातील घर लक्ष करायचे.आता मात्र तसे काही राहिलेले नाही आहे. करोना काळानंतर चोरांनी गजबजलेल्या व गल्ली बोळात भिंतीला भिंत लागुन असलेल्या घरी सुद्धा चोरी करण्याचे धाडस ठेवत आहे. त्यामुळे सामान्य, गरिब माणसाचा हातावर पै-पै गोळा केलेला घामाचा पैसा जेव्हा घरातुन चोरी होतो.तेव्हा त्याच्या आयुष्याची पुर्ण कमाईची राखरांगोळी झालेली असते. आज तसे पाहिले तर गावातील दाट वस्तीत असणाऱ्या शिवाजी चौकात ऐवढ्या मोठ्या जबरी चोरीला लक्ष करणे. म्हणजे पोलीसांना एकप्रकारे चोरांनी आव्हान दिले आहे.मात्र चोरांच्या आव्हानाला पोलीस जरासेही लक्ष देत नाही आहे. आपले नित्यनियमीत सुस्तीने काम चालू आहे. त्यामुळे सामान्य माणुस आपल्याच मालाचे सुरक्षा कसे करता येईल. ह्या विवेचंनेतुन दिवसरात्र काढत आहे. म्हणून येणाऱ्या काळात चोरींच्या घटनावर पोलीसांनी अंकुश मिळवत.जनतेला समाधानी झोपेची भेट,ह्या रक्षा बंधनाच्या पर्वापासुन द्यावी, अशी अपेक्षा सामान्य दोंडाईचा नागरिक करत आहे.


0 Comments