
================================ डोंगरगाव ( प्रतिनिधी )= शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे आज ग्रामपंचायत प्रांगणात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला ग्रा प सदस्य संजय जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच जि प शाळा मराठी शाळेत या गावातील माजी सैनिक रवींद्र रतन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून खलाने सर्कलचे मंडळ अधिकारी निलेश मोरे होते तलाठी सी डी पाटील उपस्तित होते या दिवशी भिकन तारचंद निकम यांनी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके पेढे खाऊ वाटप केले याच दिवशी कृषी विभागामार्फत आलेले फेरोमन सापळे डीसीसी बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते शेतक्ररी याना वाटप करण्यात आले तसेच2019 व 2020 या कालावधीत उत्तम घरकुल ज्या लाभार्थ्यांनी बांधले त्यांना लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील व प्रकाश पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले याच दिवशी इ पीक पाहणी कार्यक्रमही घेण्यात आला यासाठी मंडळ अधिकारी निलेश मोरे व तलाठी सीडी पाटील यांची उपस्थिती होती या दिवशी ग्रामसेविका, तलाठी ,मुख्याध्यापक ,शिक्षिका ,मंडळाधिकारी सर्व ग्रा प सदस्य गावातील सर्व मान्यवर सरपंच व उपसरपंच ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते
0 Comments