================================ डोंगरगाव ( प्रतिनिधी ) आर आर पाटील== 15 ऑगस्ट 2021 या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे उपविभागीय अधिकारी शिरपूर प्रमोद भामरे व तहसीलदार शिंदखेडा सुनील सैंदाणे यांच्या आदेशानुसार या दिवशी सकाळी जिल्ह्यातून सर्वप्रथम या गावास ई पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आला खलाने मंडळ अधिकारी निलेश मोरे ,तलाठी सि ड़ी पाटील ,तलाठी मनोज साळवे इत्यादींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या दिवशी मंडळाधिकारी निलेश मोरे यांचा सत्कार डी डी सी बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांनी केला तलाठी सीडी पाटील यांनी जास्तीत जास्त तरुणांनी याच्यात सहभागी व्हावे व 15 ऑगस्ट 2021 ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीच्या अगोदरच आपल्या गावाची इ पीक पाहणी 100% यशस्वी करून घ्यावी असे आपल्या मार्गदर्शनात संबोधिले या दिवशी कृषी विभागामार्फत देण्यात आलेले फेरोमन सापळे शेतकऱ्यांना प्रकाश पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या दिवशी गावातील शेतकरी व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती

0 Comments