शिंदखेडा- धुळे जिल्हा दोऱ्यावर असलेले महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कार्याध्यक्ष प्रणिती ताई शिंदे, आमदार कुणाल पाटील हे दि. २४ रोजी शिंदखेडा मतदार संघात आले असता. येथील
शिवाजी चौफुली वर शिंदखेडा काँग्रेस कमिटी च्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीचे नगरसेवक तथा गटनेते सुनिल चौधरी यांनी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयांची व्यथा मांडली. शिंदखेडा शहराची व परिसराची लोकसंख्या पाहता ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हा रुग्णालय करण्यात यावे अशी मागणी करून निवेदन देण्यात आले.
तसेच शहरातील विविध विकास कामासाठी निधी मिळावा, पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत आदिवासींची घरे नियामकुल करून आठ नबंर उतारा देण्यात येऊन लवकरात लवकर घरकुल मिळावे, घरकुल योजनेचा उर्वरित दीड लाख रु धनादेश मिळावा. शहरातील नगरपंचायतीचे निकृष्ट कामांची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी. यासह इतर मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक दिपक अहिरे, उदय देसले, चंद्रकांत सोनवणे, सह किरण चित्ते, शाम मालचे उपस्थित होते.

0 Comments