Header Ads Widget

*शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा =आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे* *👉🏾माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी घेतली भेट**👉🏾 मंत्रालयात घेतली बैठक*




शिंदखेडा प्रतिनिधी =सिंदखेडा शहरातील वर्षानु वर्षे रेंगाळत पडलेला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न आता आरोग्य मंत्र्यांकडे पोहोचला असून शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाच उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावे यासाठी आता थेट प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आरोग्य संचालकांना देऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेतला आहे
याबाबत आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात नाना टोपे यांनी बैठक घेतली यासाठी शिंदखेडा मतदार संघाचे माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी मागणी केली आहे
        शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावे अशी मागणी सन 2012 पासून ची आहे 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील गांधी चौकात झालेल्या जाहीर प्रचार सभेत ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय करणे बाबत आश्वासन दिले होते पाच वर्षे हे आश्वासन तर पूर्ण झालेच नाही परंतु आता राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांनी या प्रकरणी लक्ष घातल्याने शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होण्यासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत covid-19 मध्ये सर्वाधिक खर्च शासनाच्या माध्यमातून आरोग्य विभागावर होत असल्याने हा प्रश् धसास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे .दरम्यान आज माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन देखील दिले आहे दिलेल्या निवेदनात शिंदखेडा शहराची लोकसंख्या 40 हजार पेक्षा जास्त आहे या शहराला 55 ते 60 खेडेगाव लागून असून एकच ग्रामीण रुग्णालय असल्याने येथील रुग्णालयात दररोज सुमारे पाचशे ते सहाशे ओपीडी असते शहरात महत्त्वाचे हॉस्पिटल देखील नसल्याने येथील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय होणे गरजेचे आहे अशी मागणी करण्यात येऊन याबाबत तात्काळ आरोग्य संचालक यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत शिंदखेडा मतदारसंघात रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी आज पावेतो सुमारे 25 हजार पेक्षा जास्त रुग्णांना आर्थिक मदतीसह वैद्यकीय उपचार करून दिले आहेत हे सर्वद्यात आहे त्यामुळे आता रामकृष्ण पाटील यांनी हा प्रश्न हातात घेतल्याने शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रश्न मार्गी लागणार अशी आशा व्यक्त होत आहे

Post a Comment

0 Comments